तरुण भारत

काँग्रेस महिला मोर्चाकडून डीजीपीना निवेदन

पालीस मुख्यालयावर नेला मोर्चा, बाबू कवळेकरांवर कारवाई करण्याची मागणी

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्या कथीत अश्लील व्हिडीओ प्रकरणी कवळेकर यांच्या विरोधात त्वरीत कारवाई करा. अशी मागणी करीत काँग्रेस महिला मोर्चाने गुरुवारी दुपारी पोलीस मुख्यलय गाठले. यावेळी महिला मोर्चाच्या एका शिष्ट मंडळाने पोलीस महासंचकलांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. तसेच त्यांच्या समोर काही प्रश्न उपस्थित केले. पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा यंनी निःपक्षपाती कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे महिला मोर्चाच्या अध्यक्षा ऍड. प्रतिमा कुतीन्हो यांनी सांगितले.

काँग्रस महिला मोर्चाने पोलीस महासंचालकांना निवेदन सादर केल्यानंतर प्रतिमा कुतीन्हो पत्रकारांशी बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. त्या पुढे म्हणाल्या की काँग्रेस पक्षाने बाबू कवळेकर यांच्या विरोधात पणजी पोलीस स्थानक तसेच सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल करून दहा दिवस उलटले तरी अद्या प कोणतीच कारवाई का झीली नाही. बाबू कवळकरने जी गोष्ट केली आहे तीच गोष्ट एखाद्या सामान्य माणसाकडून झाली असती तरी पोलीस लगेच कारवाई कराणार होते. मग बाबू कवळेकर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना वेगळा न्याय की काय असा प्रश्न प्रतिमा कुतीन्हो यांनी उपस्थित केला. काही महिन्या पूर्वी विनयभंग प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी तसेच एका महिलेला सहकार्य करण्यासाठी आपण एक फोटो सोशल मिडीयावर उपलोड केला होता. त्यावेळी पीडित मुलीची ओळख उघड केल्याचे कारण पुढे करून आपल्यावर कारवाई केली व तक्रारपत्रही न्यायालयात सादर केले. वास्तविक त्या फोटोमध्ये पीडित मुलीची ओळख कुठेच उघड होत नव्हती तसेच मुलीचा चेहराही दिसत नव्हता. केवळ राजकीय विरोधामुळे आपल्यावर कारवाई करण्यात आली होती. असेही प्रतिमा कुतीन्हो यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्याकडून जो अश्लील व्हिडीओ वॉट्सपवर व्हायरल झाला आहे त्या वॉट्सप ग्रूपवर कित्येक महिला, युवती तसेच सुसंस्कृत नागरीकही आहेत. त्यामुळे एक प्रकारे कवळेकर यांनी त्या महिला मुलींचा विनयभंग केला असून सुसंस्कृत नागरीकांचा अपमान केला आहे. बाबू कवळेकर यांच्या मोबाईल वरून व्हिडीओ अपलोड झाला असल्याचे नाकारत नाही मात्र आपला मोबाईल कुणीतरी हॅक करून अश्लील व्हिडी अपलोड केला असल्याचे सांगतात तशी त्यांनी सायबर क्राईम विभागात तक्रारही दाखल केली आहे. हे कृत्या रात्री एक ते दिडच्या सुमारास झाले आहे. मोहाईल हॅक करण्यासाठी त्या रात्री बाबू कवळेकर कुठे होते याचा तपास होणाच्या गरजेचे आहे. वास्तविक वॉट्सप हॅक करणे तसे अशक्य आहे. केवळ लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्यासाठी  बाबू कवळेकर ही नाटके करीत असल्याचे सर्वानाच माहित आहे. असेही प्रतिमा कुतीन्हो यांनी सांगितले.

आपला मोबाईल हॅक करून अश्लील क्लिपींग अपलोड करण्यात आली असल्याची तक्रार बाबू कवळेकर यांनी सायबर क्राईम विभागाकडे देऊन कित्येक दिवस झाले आहेत. अद्याप या तक्ररारीचा तपास का होत नाही. एक उपमुख्यमंत्र्याच्या तक्रारीचा तपास होत नाही तर भाजप सरकारातील पोलीस यंत्रणे सामान्य लोकंना कसला न्याय देतील असा उलट प्रश्न कुतीन्हो यांनी उपस्थित केला आहे. बाब कवळेकर यांच्या प्रकरणाची सखोल तपास होणे नितांत गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या.

काँग्रेस महिला मोर्चाने काँग्रेस हाऊसकडून मोर्चाला सुरुवात केली होती. पोलीस मुख्यालया समोर कडेक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चात सुमारे 20 महिला उपस्थित होत्या. भाजप सरकार तसेच बाबू कवळेकर यांच्या विरोधात घोषणा देते मुख्यलयासमोर पोचले. त्यांनी पोलीस महासंचालकांना भेटण्याची मागणी केली असता त्यांना मुख्य गेटबाहेरच अडविण्यात आले होते. यावेळी झटापट झाली मात्र पोलिसांनी त्यांना आत सोडलेच नाही शेवटी पोलीस महासंचालकांनी हस्तक्षेप करून महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाला भेटण्याची परवंगी दिली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच योग्य कारवाई करण्याचे आश्वसन दिले आहे.

Related Stories

वैयक्तिक फायद्यासाठीच भिंगीचा भाजपात प्रवेश

Amit Kulkarni

कॅसिनोंचे व्यापार परवाने नूतनीकरणाचा मार्ग मोकळा मनपाच्या बैठकीत मंजुरी

Omkar B

मुरगाव पालिकेचे कामगार वेतनासासाठी पुन्हा संपावर

Amit Kulkarni

पोर्तुगीजांविरुद्धच्या कुंकळ्ळीतील लढय़ाला तोड नाही

Amit Kulkarni

नियम पाळा, कोरोना टाळा, काळजी घ्या

Omkar B

खाणी सुरू करण्यासाठी आता दिल्लीत बैठक

Patil_p
error: Content is protected !!