तरुण भारत

आचारसंहितेचे उल्लंघन; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला निवडणूक आयोगाचा झटका

  • न्यायालयात दाद मागणार काँग्रेस

ऑनलाईन टीम / भोपाळ : 


भारतीय निवडणूक आयोगानेआचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे मध्य प्रदेशचे  माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना झटका देत त्यांचे स्टार प्रचारक या यादीतून नाव काढून टाकले आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षाने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कमलनाथ यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या, त्यामुळे त्यांचे स्टार कँम्पेनर पद काढून घेण्यात आले आहे. कमलनाथ यांनी भाजप नेत्या इमरती देवी यांना आयटम संबोधले होते. तसेच शिवराज सिंह चौहान यांना नौटंकी कलाकार म्हटले होते. 


मध्यप्रदेशच्या सीईओने सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर ही कारवाई केली आहे. या अहवालात कमलनाथ यांनी आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.


दरम्यान, कमलनाथ यांना निवडणूक आयोगाकडून वारंवार समजही देण्यात आली होती. मात्र, तरीही त्यांनी याकडे लक्ष न देता आचारसंहितेचे उल्लंघन केले. त्यामुळे अखेर त्यांना आदर्श आचार संहिता अनुच्छेद 1 आणि 2 अन्वये दोषी ठरवून कारवाई करण्यात आली आहे.


काँग्रेसच्या मध्यप्रदेश मधील प्रवक्त्या नरेंद्र सलुजा यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाचा हा निर्णय मान्य नसल्याने या प्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.  

Related Stories

झुंज देण्यासाठी सज्ज व्हा!

tarunbharat

बिहार : 15 बंडखोर नेत्यांची जनता दलातून हकालपट्टी

datta jadhav

बिहारमध्ये 713 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

pradnya p

नुकसानग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारकडून 10 हजार कोटींचे पॅकेज : उध्दव ठाकरे

pradnya p

भारतात मागील 24 तासात आढळले सर्वाधिक कोरोना रुग्ण

datta jadhav

देशात अद्याप समूह संसर्ग नाही

tarunbharat
error: Content is protected !!