तरुण भारत

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

चौकुळच्या जंगलातील घटना : थोडक्यात बचावले प्राण

वार्ताहर / आंबोली:

Advertisements

चौकुळ चिखलव्हाळ बेरडकी येथील वस्तीपासून जवळच असलेल्या थोरलामाळ जंगलात नागेश रेमू नाईक या 52 वर्षीय शेतकऱयावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. प्रसंगावधान राखून त्यांनी आरडाओरड केल्याने शेजारील युवक धावून आले. त्यानंतर अस्वलाने जंगलात धूम ठोकली. सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची खबर मिळताच वन कर्मचाऱयांनी घटनास्थळी जात ग्रामस्थांच्या मदतीने जखमी शेतकऱयाला आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

नागेश नाईक हे सकाळी साडेआठच्या सुमारास आपली गुरे घेऊन हाकेच्या अंतरावर असलेल्या थोरलामाळ जंगलात गेले होते. गुरे सोडून ते नाचणीच्या शेतात येणाऱया रानटी प्राण्यांना हाकलवून लावण्यासाठीच्या बुजगावणीच्या काठय़ा काढत असताना झुडपात आधीच दबा धरून असलेल्या अस्वलाने त्यांना काही कळायच्या आत हल्ला केला. अस्वलाने प्रथम नागेश यांच्या पायाचा चावा घेऊन त्यांना फरफटत ओढत नेले. पायाचा चावा घेतल्याने पायाच्या खालील बाजूचे हाड मोडले आहे. त्यानंतर त्याने हाताचा चावा घेतला. तसेच डोक्याच्या मागील बाजूला नखाने जखमा केल्या आहेत. या परिस्थितीतही त्यांनी बचावासाठी आरडाओरड केली.  त्यावेळी तेथूनच जवळच असलेले भरत विठ्ठल नाईक आणि विठ्ठल सैना नाईक यांनी तेथे धाव घेतली. समोर अस्वल पाहून त्या दोघांनी जोरात आरडाओरड केली. त्या आवाजाने अस्वलाने तेथून धूम ठोकली 

त्या दोघांनी जखमी नागेश यांना एका चादरीत बांधून वस्तीवर आणले. तसेच 108 रुग्णवाहिकेला कॉल केला. तसेच वन कर्मचाऱयांना घटनेची माहिती दिली. आंबोली वनपाल व्ही. डी. चाळके, चौकुळ वनरक्षक गोरख भिंगारदिवे, अ. वि. पटेकर, वनमजूर बाळा गावडे, मंगेश सावंत, नामदेव गावडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच जखमीला ग्रामस्थांच्या मदतीने आंबोली
प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

आंबोली आरोग्य केंद्रासाठी 108 रुग्णवाहिका आहे. मात्र, रुग्णवाहिकेवर गेले तीन-चार महिने डॉक्टरच नाहीत. त्यामुळे रुग्णवाहिका चालक पेशंटला आणण्यास जाऊ शकत नाही. जिह्यात सर्रास रुग्णवाहिकेवर डॉक्टर नसल्याने रुग्णवाहिकेच्या चालकांना त्यांच्या वरिष्ठांकडून पेशंटची अवस्था जाणून घेत नातेवाईकांच्या परवानगीनेच रुग्णांना जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्याचे आदेश आहेत.

जखमी नाईक यांना नेण्यासाठी रुग्णवाहिका आणण्याचा कॉल येताच चालक अर्जुन राऊत यांनी तातडीने घटनास्थळ गाठत जखमीला आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथे डॉ. महेश जाधव, परिचारिका अस्मिता कोठावळे आणि सहकाऱयांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सावंतवाडी कुटिर रुग्णालयात पाठविले. जखमीला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वन कर्मचाऱयांनी सांगितले. imestamp

Related Stories

भाजपची आगामी निवडणुकांची तयारी

Patil_p

खेडमधून 190 मध्यप्रदेशातील मजूर पनवेलला रवाना

Patil_p

रत्नागिरी एसटी चे 42 कोटींचे नुकसान तर उत्पन्न 9 लाख!

Patil_p

कन्टेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची मदत

NIKHIL_N

असनिये-तांबोळी रस्त्याची श्रमदानातून साफसफाई

Ganeshprasad Gogate

मालवणात आणखी पाचजण दाखल

NIKHIL_N
error: Content is protected !!