तरुण भारत

सीमाप्रश्नासाठी काळ्यादिनी सर्वजण एकत्र येऊया

कंग्राळी खुर्द येथे युवा आघाडीतर्फे चर्चासत्राचे आयोजन

वार्ताहर / कंग्राळी खुर्द

Advertisements

कंग्राळी परिसरासह पंचक्रोशीतील नागरिक 1 नोव्हेंबर काळा दिन मोठय़ा गांभीर्याने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवार दि. 30 रोजी युवा आघाडीतर्फे कंग्राळी खुर्द येथे याबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. महात्मा फुले मंगल कार्यालयात आयोजित चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी मार्कंडेय शिक्षण संस्थेचे संचालक एम. एन. पाटील होते.

यावेळी व्यासपीठावर जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, महात्मा फुले मंडळाचे उपाध्यक्ष युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, ऍड. एम. जी. पाटील, ग्राम विकास आघाडीचे अध्यक्ष आर. आय. पाटील मार्कंडेय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बी. डी. पाटील, निवृत्त मुख्याध्यापक टी. जे. पाटील, प्रेमा जाधव उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना सरस्वती पाटील म्हणाल्या, 1956 ला भाषावार प्रांतरचना झाली तेव्हापासून हा लढा महाराष्ट्र एकिकरण समितीने लढे दिले. त्यामध्ये अनेकजण हुतात्मे झाले. आम्ही हा लढा गांभीर्याने आजपर्यंत पाहत आलोय. मात्र कर्नाटक शासन कोरोनाचा बाऊ करून आमच्यावर निर्बंध लादत आहेत. आम्ही हा दिवस काळादिवस म्हणून पाळतो. यासाठी सायकलफेरी, मूकमोर्चा याद्वारे आमच्या भावना कर्नाटक शासनाला दाखवून देतो. मात्र या उलट दरवर्षी राज्योत्सवसाठी भाडोत्री लोकांचा भरणा करून त्यांच्यासाठी पोटभर जेवण आणि 500 रु. देऊन लोकांना जमविले जात असते. मात्र आम्ही लोकशाही मार्गाने लढण्याचा सीमावासियांना अनेक निर्बंध लादत असल्याचे सांगितले.

सीमावासियांनी केलेल्या योगदानामुळे आणि हुतात्म्यांच्या बलीदानामुळे हा प्रश्न आजपर्यंत धगधगता आहे. आज सर्व मराठी भाषिकांनी गटतट आणि पक्षभेद विसरून सीमाप्रश्नासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे आर. आय. पाटील यांनी सांगितले.

बी. डी. पाटील

यावर्षी कर्नाटक शासनाने अनेक जाचक अटी घातल्या आहेत. मात्र सीमावासियांनी घरावर काळे झेंडे, काळे कपडे, काळे मास्क, घालून शासनाचा निषेध नोंदवावा आणि याद्वारे महाराष्ट्रात जाण्याच्या आपल्या भावना व्यक्त कराव्यात असे आवाहन केले.

यावेळी युवा आघाडी अध्यक्ष शुभम शेळके कार्याध्यक्ष धनंजय पाटील आदी मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे झाली. सूत्रसंचालन सी. डी. पाटील यांनी केले. तर ऍड. एम. जी. पाटील यांनी आभार मानले. यावेळी युवा आघाडीचे चंद्रकांत पाटील, चंद्रकांत नाना पाटील, माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष अनंत निलजकर, राजू बाळेकुंद्री, गजानन पाटील, जी. जी. कंग्राळकर, महेश जाधव, ऍड. सतीश बांदीवाडेकर, रामचंद्र पावशे, बाळ बसरीकट्टी, विनोद माटारे, यांच्यासह कंग्राळी खुर्दसह पंचक्रोशीतील सिमावासिय मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

हलगा-मच्छे बायपासमधील एजंट आले अडचणीत

Patil_p

हारुगेरी नगराध्यक्षपदी निर्मला कुरी

Patil_p

विजापूर जिल्हय़ात 81 अहवाल निगेटिव्ह

Patil_p

उचगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने डॉक्टर योद्धय़ांचा सत्कार

Patil_p

विकेंड लॉकडाऊन काळात बँका बंद एटीएम सुरू

Rohan_P

लोकमान्य सोसायटीतर्फे सामाजिक संघटनांना धान्याचे वितरण

Omkar B
error: Content is protected !!