तरुण भारत

जिह्यात सव्वादोन लाखांवर स्वॅब तपासणी

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना महामारीचा फैलाव कमी होत चालला आहे. या काळात आरोग्य विभागाने जिह्यातील 2 लाख 19 हजारहून अधिक जणांची स्वॅब तपासणी केली असून शुक्रवारी 50 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा सरकारी आकडा 333 वर पोहोचला आहे.

Advertisements

1 लाख 91 हजार 603 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. एकूण बाधितांची संख्या 24 हजार 642 वर पोहोचली असून 23 हजार 796 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 513 सक्रिय रुग्ण आहेत. तर शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 85 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

बेळगाव येथील 64 वषीय वृध्द व बैलहोंगल येथील 46 वषीय रहिवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहर व उपनगरांतील 8 व ग्रामीण भागातील 3 असे बेळगाव तालुक्मयातील 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अद्याप 1468 जणांचे अहवाल यायचे आहेत. तर 28 हजार 996 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.

मुतगा, बापट गल्ली, नानावाडी, भाग्यनगर, चिदंबरनगर, न्युवंटमुरी, पिरनवाडी, संकमेश्वरनगर, विनायकनगर, वंटमुरी, टी. व्ही. सेंटर, टिळकवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्या घटल्यामुळे साहजिकच सिव्हिल हॉस्पिटलवरील ताण कमी झाला आहे. बरे होणाऱयांचे प्रमाणही अधिक आहे.

Related Stories

मराठी भाषा-संस्कृतीच्या अस्मितेसाठी लोक लढा गरजेचा

Patil_p

निवृत्त मुख्याध्यापक ए. के. पाटील यांचा सत्कार

Patil_p

बेळगावसह 15 जिल्हय़ांमध्ये नव्या कूपनलिका खोदण्यास बंदी

Omkar B

आजपासून सिव्हिल हॉस्पिटलमधील ओपीडीला सुरुवात

Patil_p

28 फेब्रुवारीपर्यंत वाढविली जुन्या बसपासची मुदत

Amit Kulkarni

चिदंबरनगरमधील झाडे तोडल्याप्रकरणी पर्यावरणप्रेमींची निदर्शने

Patil_p
error: Content is protected !!