तरुण भारत

देसूर जवळ अपघातात चिकोडीचा तरुण ठार

अज्ञात वाहनाच्या ठोकरीने घडला अपघात

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

देसूर जवळ अज्ञात वाहनाच्या ठोकरीने चिकोडी येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.

पुरंदर परशराम इदलहोंड (वय 28, रा. चिकोडी) असे त्या दुर्देवी तरुणाचे नाव आहे. पुरंदर चिकोडीत राहतो. त्याचे वडील झाडशहापूरला राहतात. वडिलांना भेटून चिकोडीला परतताना देसूर येथे आपली मोटार सायकल उभी करुन तो किराणा दुकानात गेला होता.

किराणा दुकानातून मोटार सायकलकडे जाताना अज्ञात वाहनाची धडक बसून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन त्याचा मृतदेह नामेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related Stories

समिती नेते, कार्यकर्त्यांना नोटीसा

Patil_p

मार्च अखेरपर्यत साडेआठ कोटी घरपट्टी वसुल करण्याचे उद्दिष्ट

Patil_p

हरिकाका कंपाऊंडमध्ये शरद पवारांचा वाढदिवस साजरा

Patil_p

गळतीमुळे इंदिरा कॉलनीत पाणी समस्या

Amit Kulkarni

वनखात्यातर्फे रोप लागवडीला प्रांरभ

Patil_p

माजी विद्यार्थी संघटनेतर्फे लक्ष्मीबाई शहापूरकर यांचा सत्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!