तरुण भारत

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील 55 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

मडगाव

 फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडने (एफएसडीएल) काल आपल्या 2020-21 आयएसएल फुटबॉल मोसमातील पहिल्या 11 फेऱयांतील 55 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. आयएसएल फुटबॉल स्पर्धेचा हा सातवा मोसम असून यातील सर्व सामने गोव्यात होणार आहेत. उर्वरीत 60 सामन्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.

20 नोव्हेंबर रोजी बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर केरळ ब्लास्टर्स आणि एटीके मोहन बगान यांच्यात सलामीचा सामना होईल. केरळ ब्लास्टर्स, एटीके मोहन बगान, बेंगलोर एफसी, एफसी गोवा, चेन्नईन एफसी, मुंबई सिटी एफसी ओडिशा एफसी, ईस्ट बंगाल, हैदराबाद एफसी, जमेशदपूर एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी असे 11 संघ भाग घेत असून यातील सामने जीएमसी बांबोळी, वास्कोच्या टिळक मैदान आणि फातोर्डाच्या नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात येतील.

नवोदीत एससी ईस्ट बंगालचा पहिला सामना आणि कोलकाताची डर्बी त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी एटीके मोहन बगान संघाशी 27 नोव्हेंबर रोजी वास्कोतील टिळक मैदानावर होईल. यंदा या लीगमध्ये ईस्ट बंगालचा समावेश झाल्याने यंदा 115 सामने होतील. गेल्या मोसमात 95 सामने खेळविण्यात आले होते. सहभागी 11 क्लब्स डबल राऊंड रॉबिनमध्ये खेळतील. यातील प्रथम चार स्थाने मिळविणारे संघ स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये जातील. गतवर्षी लीग जेतेपद मिळविलेल्या एफसी गोवाचा सामना 22 नोव्हेंबर रोजी फातोर्डा मैदानावर बेंगलोर एफसीशी होईल.

आयएसएल सामन्यांचे वेळापत्रक याप्रमाणे:

नोव्हेंबर महिन्यातील सामने

20 : केरळ ब्लास्टर्स वि. एटीके मोहन बगान (बांबोळी),

21 : नॉर्थईस्ट युनायटेड वि. मुंबई सिटी (टिळक मैदान),

22 : एफसी गोवा वि. बेंगलोर एफसी (फातोर्डा),

23 : ओडिशा एफसी वि. हैदराबाद एफसी (बांबोळी),

24 : जमशेदपूर एफसी वि. चेन्नईन एफसी (टिळक मैदान),

25 : एफसी गोवा वि. मुंबई सिटी एफसी (फातोर्डा),

26 : केरळ ब्लास्टर्स वि. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (बांबोळी),

27 : एससी ईस्ट बंगाल वि. एटीके मोहन बगान (टिळक मैदान),

28 : बेंगलोर वि. हैदराबाद (फातोर्डा) सर्व सामने सायं. 7.30 वाजता. 

29 : जमशेदपूर वि. ओडिशा (टिळक मैदान, सायं.5 वाजता),

     चेन्नईन वि. केरळ ब्लास्टर्स (बांबोळी, सायंकाळी 7.30 वाजता),

30 : एफसी गोवा वि. नॉर्थईस्ट युनायटेड (फातोर्डा, सायंकाळी 7.30 वा.).

डिसेंबर महिना, सर्व सामने सायंकाळी 7.30 वाजता,

1 : मुंबई सिटी एफसी वि. एससी ईस्ट बंगाल (बांबोळी),

2 : हैदराबाद एफसी वि. जमशेदपूर एफसी (टिळक मैदान),

3 : एटीके मोहन बगान वि. ओडिशा एफसी (फातोर्डा),

4 : चेन्नईन एफसी वि. बेंगलोर एफसी (बांबोळी),

5 : नॉर्थईस्ट युनायटेड एफसी वि. एससी ईस्ट बंगाल (टिळक मैदान),

6 : मुंबई सिटी एफसी वि. ओडिशा एफसी (बांबोळी, 5 वाजता),

6 : एफसी गोवा वि. केरळ ब्लास्टर्स (सायंकाळी 7.30 वाजता),

7 : जमशेदपूर एफसी वि. एटीके मोहन बगान (टिळक मैदान),

8 : बेंगलोर एफसी वि. नॉर्थईस्ट युनायटेड (फातोर्डा),

9 : मुंबई सिटी एफसी वि. चेन्नईन एफसी (बांबोळी),

10 : एससी ईस्ट बंगाल वि. जमशेदपूर एफसी (टिळक मैदान),

11 : एटीके मोहन बगान वि. हैदराबाद एफसी (फातोर्डा),

12- ओडिशा एफसी वि. एफसी गोवा (बांबोळी),

13- नॉर्थईस्ट युनायटेड वि. चेन्नई (टिळक मैदान, सायं. 5.30 वा.), बेंगलोर वि. केरळ ब्लास्टर्स (फातोर्डा, सायंकाळी 7.30 वाजता),

14 : मुंबई सिटी वि. जमशेदपूर एफसी (बांबोळी),

15 : हैदराबाद एफसी वि. एससी ईस्ट बंगाल (टिळक मैदान),

16 : एटीके मोहन बगान वि. एफसी गोवा (फातोर्डा),

17 : ओडिशा एफसी वि. बेंगलोर एफसी (बांबोळी),

18 : नॉर्थईस्ट एफसी वि. जमशेदपूर एफसी (टिळक मैदान),

19 : एफसी गोवा वि. चेन्नईन एफसी (फातोर्डा),

20 : हैदराबाद एफसी वि. मुंबई सिटी (टिळक मैदान, सायंकाळी 5.30 वाजता), केरळ ब्लास्टर्स वि. एससी ईस्ट बंगाल (बांबोळी),

21 : एटीके मोहन बगान वि. बेंगलोर एफसी (फातोर्डा),

22 : ओडिशा एफसी वि. नॉर्थईस्ट एफसी (बांबोळी),

23 : जमशेदपूर एफसी वि. एफसी गोवा (टिळक मैदान),

26 : एससी ईस्ट बंगाल वि. चेन्नईन एफसी (टिळक मैदान),

27 : केरळ ब्लास्टर्स वि. हैदराबाद एफसी (बांबोळी),

28 : बेंगलोर एफसी वि. जमशेदपूर एफसी (फातोर्डा),

29 : चेन्नईन एफसी वि. एटीके मोहन बगान (बांबोळी),

30 : हैदराबाद एफसी वि. एफसी गोवा (टिळक मैदान).

जानेवारी

2 : मुंबई सिटी वि. केरळ ब्लास्टर्स (बांबोळी, सायंकाळी 7.30 वाजता),

3 : ईस्ट बंगाल वि. ओडिशा (टिळक मैदान, सायं. 5.30 वाजता), एटीके मोहन बगान वि. नॉर्थईस्ट युनायटेड (फातोर्डा, सायं.7.30 वा.),

4 : चेन्नईन एफसी वि. हैदराबाद एफसी (बांबोळी),

5 : बेंगलोर एफसी वि. मुंबई सिटी (फातोर्डा),

6 : एससी ईस्ट बंगाल वि. एफसी गोवा (टिळक मैदान),

7 : केरळ ब्लास्टर्स वि. ओडिशा एफसी (बांबोळी),

8 : नॉर्थईस्ट युनायटेटड वि. हैदराबाद एफसी (टिळक मैदान),

9 : बेंगलोर एफसी वि. एससी ईस्ट बंगाल (फातोर्डा),

10 : चेन्नईन वि. ओडिशा (बांबोळी, सायंकाळी 5.30 वाजता), जमशेदपूर एफसी वि. केरळ ब्लास्टर्स (टिळक मैदान, सायंकाळी 7.30),

11 : एटीके मोहन बगान वि. मुंबई सिटी एफसी (फातोर्डा).

Related Stories

माकडाने ओरबाडल्याने ऑस्ट्रेलियाचा मॅक्गर्क जखमी

Patil_p

बायचुंग भुतिया अध्यक्षपदासाठी उत्सुक

Patil_p

टाटा ओपनमध्ये प्रजनेश गुणनेश्वरणला मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश

Patil_p

रोहितच्या खात्यावर असाही नामुष्कीजनक विक्रम

Patil_p

दक्षिण आफ्रिकेच्या डावात रॉसी व्हान डर डय़ुसेनचे नाबाद शतक

Patil_p

मुंबई इंडियन्सची अव्वलस्थानी गरुडझेप

Patil_p
error: Content is protected !!