तरुण भारत

बेंगळूर संघाला प्लेऑफसाठी विजयाची गरज

वृत्तसंस्था/ शारजाह

आयपीएल क्रिकेट स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून प्लेऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. शनिवारी येथे कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि वॉर्नरचा सनरायजर्स हैद्राबाद यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. बेंगळूर संघाला या स्पर्धेच्या प्लेऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी विजयाची नितांत गरज आहे.

या स्पर्धेत धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे. गुरुवारच्या सामन्यात चेन्नईने विजय मिळविला असला तरी त्यांना प्लेऑफ  पात्रतेसाठी हा विजय पुरेसा नाही. प्ले ऑफ गटात एकूण चार संघांचा सहभाग राहतो. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर हे संघ आघाडीवर असून चौथ्या संघासाठी आता चुरस निर्माण झाली आहे. हैद्राबाद संघाने यापूर्वीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा धक्का देत आपले आव्हान जिवंत राखले आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा संघ दुसऱया स्थानावर आहे. प्राथमिक फेरीतील आता त्यांचे दोन सामने बाकी असून त्यापैकी किमान एक सामना जिंकणे जरुरीचे आहे. हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्याबरोबर बेंगळूरचे शेवटचे दोन सामने होणार आहेत. बेंगळूर संघाने आपले हे दोन्ही आगामी सामने गमावले तर ते मात्र गुणतक्त्यात 14 गुणांवर राहतील. पण या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांच्या निकालावर त्यांचे प्ले ऑफ गटातील भवितव्य अवलंबून राहू शकेल. मात्र, वॉर्नरच्या हैद्राबाद संघाला आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित दोन सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील. या स्पर्धेत 14 गुण मिळविणाऱया संघांमध्ये प्ले ऑफ स्थानासाठी चुरस लागणार असून शेवटी सरस धावसरासरी महत्त्वाची ठरणार आहे. हैद्राबाद संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात सध्या सहावे स्थान मिळविले असून त्यांनी बारा सामन्यातून 10 गुण घेतले आहेत. आता हैद्राबाद संघाला बेंगळूर आणि मुंबई इंडियन्स विरुद्धचे शेवटचे दोन सामने जिंकावेच लागतील. तरच त्यांना प्ले ऑफ गटातील प्रवेशाची आशा बाळगता येईल.

सध्या पंजाब संघाची जोरदार घोडदौड सुरू असून हा संघ 16 गुणांचा आकडा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या पंजाबचा संघ 12 गुणांवर आहे. त्यांचे दोन सामने बाकी आहेत. शनिवारच्या सामन्यात हैदाबाद संघातील हुकूमी फिरकी गोलंदाज रशिद खानचे बेंगळूरच्या फलंदाजांसमोर मोठे आव्हान राहील. हैद्राबाद संघातील कर्णधार वॉर्नर, बेअरस्टो, मनीष पांडे, साहा यांची फलंदाजी बहरत असल्याचे जाणवते. शनिवारचा सामना दोन्ही संघांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून बेंगळूर संघाला हैद्राबादसमोर कसरत करावी लागेल.

Related Stories

ऑस्ट्रेलियाचा ८ गड्यांनी दणदणीत विजय

Patil_p

राष्ट्रीय टेबल टेनिस शिबीर पुन्हा लांबणीवर

Patil_p

पहिला सामना जिंकून न्यूझीलंडची मालिकेत आघाडी

Patil_p

राजस्थान-बेंगळूर संघांची आज ‘रॉयल’ लढत

Patil_p

‘तो’ खेळाडू चर्चेत… क्रिकेटसाठी नव्हे…सारासाठी!

Omkar B

संजू सॅमसन-स्टीव्ह स्मिथची आक्रमक अर्धशतके

Patil_p
error: Content is protected !!