तरुण भारत

विक्रीच्या प्रभावामुळे सेन्सेक्सची पडझड

जागतिक संकेताचा परिणाम : निफ्टी 11,650 च्या खाली

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisements

जागतिक बाजारातील संकेतामुळे चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी बाजारात घसरणीचे सत्र राहिले होते. समभाग विक्रीच्या प्रभावामुळे सेन्सेक्स जवळपास 136 अंकांनी घसरुन बंद झाला. प्रमुख कंपन्यांमध्ये इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले आहेत.

प्रमुख कंपन्यांच्या समभाग घसरणीने दिवसभरात सेन्सेक्समध्ये 746 अंकांची चढ उतार दिसली. अंतिम क्षणी सेन्सेक्स 135.78 अंकांनी घसरुन निर्देशांक 39,614.07 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 28.40 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 11,642.40 वर बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये भारती एअरटेलचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला मात्र टाटा स्टील, एनटीपीसी, सन फार्मा, नेस्ले इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएस नफ्यात राहिले आहेत.

जागतिक पातळीवरील विविध घडामोडींच्या प्रभावामुळे देशातील भांडवली बाजारांची पडझड राहिली आहे. कारण गुंतवणूकदारांनी वाहन कंपन्यांच्या समभागांची विक्री मोठय़ा प्रमाणात केल्याचाही परिणाम दिसून आला असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. अंतिम दिवशी शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात मोठी तेजी दिसून आली आहे. कंपनीचे दुसऱया तिमाहीतील नफा कमाईचे आकडे सादर होण्याअगोदरच रिलायन्स समभागात तेजी राहिली असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. 

अमेरिकी निवडणुकीचा प्रभाव

शेअर बाजारात एका बाजूला युरोपमधील देशांची कोविड 19 ची चिंतेची स्थिती व दुसऱया बाजूला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या संकेतामुळे बाजारातील अस्थिर वातावरणाचा अप्रत्यक्षपणे परिणाम गुंतवणूकदारांवर होत आहे.

Related Stories

गोल्डमॅन सॅचकडून एनएन इन्वेस्टमेंटची खरेदी

Amit Kulkarni

‘एलजी’कडून नवा प्रोजेक्टर लाँच

Omkar B

तेजसला भारती एअरटेलकडून कंत्राट

Patil_p

टाटा कम्युनिकेशनचे फ्रान्सच्या ‘ईसिम’कडून अधिग्रहण

Omkar B

बालाजी वेफर्सचा नवा प्रकल्प

Patil_p

जेफ बेजोस फोर्ब्सच्या यादीत अग्रस्थानी

Patil_p
error: Content is protected !!