तरुण भारत

रिव्हॉल्युशनरी गोवन्सची फोंडा पालीकेवर धडक

बिगरगोमंतकीयांचे रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

प्रतिनिधी/ फोंडा

Advertisements

फोंडा पालीका क्षेत्रात रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱया बिगरगोमंतकीयांवर कारवाई करावी असे निवेदन रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) तर्फे पालीका मुख्याधिकारी केदार नाईक यांनी सादर केले आहे.मात्र याप्रकरणी मुख्याधिकारी कोणतेच सहकार्य करीत नसल्याचा आरोप आरजी कार्यकर्त्यांनी केला आहे.

बिगरगोमंतकीयांनी सर्रास रस्त्यावर व्यवसाय थाटल्यामुळे शेडमध्ये व इतरत्त बसून व्यवसाय करीत असलेल्या स्थानिक गोमंतकीय व्यापाऱयांना फटका बसत आहे. फोंडय़ातील राजकारण्यांनी आपली मतपेटी सांभाळण्यासाठी बिगरगोमंकीय व्यापाऱयाच्या पाठिशी असल्याचा आरोप आरजी कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे बिगरगोमंतकीय व्यापाऱयाची दादागिरी फोंडा तालुक्यात वाढलेली आहे. वाहतूकीला अडथळा करून व्यवसाय थाटलेल्या व्यापाऱयाना विविध राजकीय पक्षाच्या गॉडफादरांचा वरदहस्त लाभत आहे.

अतिक्रमण हटविल्यानंतर परत त्याच जागेवर व्यवसाय

ढवळी फोंडा येथील जन्क्शनवर वाहतूकीला अडथळा करणाऱया व्यापाऱयावर आरजीच्या तक्रारीनुसार फोंडा पोलिसांनी कारवाई केली. मात्र दुसऱया दिवशी त्याच जागेवर पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्या बिगरगोमंतकीयांनी पुन:व्यवसाय थाटल्यामुळे सदर प्रकरण पालीका मुख्याधिकाऱयापर्यंत पोचले. बिगरगोमंतकीयाचे या धाडसामागे एका स्थानिक पक्षाच्या कार्यकर्त्याचा हात असल्याचा दावा आरजीचे सदस्य विश्वेश नाईक यांनी केला आहे. बिगरगोमंतकीयांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक व्यापाऱयावर उपासमारीची वेळ आलेली आहे. पंचायत व पालीकेने स्थानिक व्यापाऱयांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. फेंडय़ात सदर परिस्थिती उलटी  असून येथे बिगरगोमंतकीयांना पाठिशी खंबीरपणे राहण्याचे प्रकार घडत आहे.  रिव्हॉल्युशनरी गोवन्स सतत स्थानिक गोमंतकीयांच्या समस्या मांडून त्याच्या पाठिशी सदैव राहणार असल्याचा दावा गौरेश गावकर यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

Related Stories

गोवा डेअरीच्या आर्थिक स्थितीबाबत दुध उत्पादकांना सभ्रमात ठेवू नका

Patil_p

वाळपईत उमेदवारीवरून काँग्रेस बैठकीत खडाजंगी

Amit Kulkarni

नाही तयारी, रंगरंगोटीही नाही… शिरगावात केवळ शांतता !

Omkar B

भाजपतर्फे अघोषित आणिबाणी लागू

Patil_p

कृषीहिताचे कायदे मागे घेणे अशक्य

Patil_p

भाजप राजकारणातून सहजासहजी संपणार नाही

Omkar B
error: Content is protected !!