तरुण भारत

चित्रपट महामंडळातील वाद उफाळला!

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोरोनाच्या संकट काळात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने गरजू सभासदांना साखर वाटण्यात आली. त्यातील शिल्लक साखर काही संचालकांनी लाटली असल्याचा गंभीर आरोप उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मला दोन लाख रूपयांच्या चेक गहाळ प्रकरणात खोटा आरोप करून नाहक गोवण्याचा प्रयत्न केल्याचेही यमकर यांनी सांगितले. यावेळी माजी अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर कार्यवाह बाळा जाधव, संचालक सतिश रणदीवे, सतिश बिडकर, मिलिंद अष्टेकर उपस्थित होते. यमकर यांच्या खळबळजनक आणि गंभीर आरोपांनंतर आता चित्रपट महामंडळातील वाद, संघर्ष उफाळून आला आहे.

Advertisements

महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत उपाध्यक्ष यमकर म्हणाले, कोरोना संकट काळात महामंडळाकडून गरजू सभासदांना मदत म्हणून वाटण्यात येणारे गृहपयोगी साहित्य, साखर, तेल अशा वस्तू काही संचालकांनी लाटल्या. हा गंभीर प्रकार आहे. पण अध्यक्ष राजेभोसले यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मदत म्हणून देण्यात येणाऱया पैशातील पंचवीस हजार रूपये जेवनावळीवर खर्च करण्यात आले. या प्रकारात सहखजिनदार शरद चव्हाण, स्वीकृत संचालक रवि गावडे, प्रशासकीय अधिकारी अर्जुन नलवडे आणि सभासद सुरेंद्र पन्हाळकर सहभाग असल्याचेही यमकर यांनी सांगितले. साखर लाटण्याच्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज यमकर यांनी या पत्रकार परिषदेत दाखविले.

यमकर म्हणाले, अध्यक्ष राजेभोसले यांच्या निर्णयाविषयी जर कुणी विचारणा केली तर ते त्याच्या विरोधात राजकारण करून त्रास देण्याचा प्रकार करतात. त्याचा अनुभव मलाही आला आहे. दोन लाख रूपयांच्या चेक गहाळ प्रकरणाच्या खोटय़ा आरोप मला गुंतवून माझ्याच नावावर रक्कम भरण्याचा प्रकारही त्यांनी केला आहे, असा आरोपही यमकर यांनी केला.   यमकर म्हणाले, 54 वर्षाची परंपरा असलेल्या चित्रपट महामंडळाचे अस्तीत्वच घालवून ही संस्था महाकला मंडळ सारख्या संस्थेत सामील करण्याचा घाट घातला जात आहे. या मागे अध्यक्ष राजेभोसले यांचा स्वार्थ आहे. या प्रकाराला सर्व कलाकारांनीही विरोध केला आहे. माजी अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर म्हणाले, महामंडळामध्ये घटनाबाह्य गेष्टी घडत असून या प्रकरणाबाबत कारवाई होणे गरजेचे आहे. बाळा जाधव म्हणाले, काही लोकांनी कलाकारांसाठी रोख स्वरुपात मदत केली होती. त्याचा हिशेबच महामंडळाकडे नाही.

Related Stories

घटनादुरुस्ती हाच शेवटचा पर्याय

Abhijeet Shinde

कोल्हापूर तिरुपती विमान सेवा 30 जून पर्यंत राहणार बंद

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये आज २७ पॉझिटीव्ह

Abhijeet Shinde

भाजप – संभाजी ब्रिगेड युती ?; भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

Abhijeet Shinde

खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

Abhijeet Shinde

सातारा जिल्हय़ात आता होम आयसोलेशन; 148 बाधित, 90 मुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!