तरुण भारत

गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन सुरू करा

खासदार संभाजीराजे यांची मागणी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घेतली भेट

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन केली आहे. इतिहासाचा अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांबरोबर संशोधक, अभ्यासक यांना या अध्यासनाचा लाभ होईल, असेही यावेळी खासदार संभाजीराजे यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत खासदार संभाजीराजे यांनी मराठी सत्ता आणि पूर्वीच्या काळी गोव्याचे पोर्तुगिज यांच्यातील  ऐतिहास संबंध आणि संघर्षाला उजाळा दिला. गोव्याचे पोर्तुगीज आणि मराठा सत्तांमध्ये नेहमी संघर्ष राहिला होता. व्यापारी संबंध देखील होते. त्यामुळे अनेक पत्रव्यवहार झाले होते. त्यातून रायगड संबंधातील काही नोंदी सापडतील का? हा प्रमुख उद्देश आहे. तसे थेट पुरावे सापडले तर, रायगड संवर्धन कार्यात त्याचा उपयोग होईल, असे सांगून संभाजीराजे यांनी रायगड विकास प्राधिकरणाला गेवा सरकारने पोर्तुगीज काळातील ऐतिहासिक कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि संदर्भग्रंथ याबाबत सहकार्य करण्याची विनंती केली. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमच्याकडे पोर्तुगीज आणि मराठी किंवा इंग्रजी जाणणारे लोक आहेत. त्यांच्या माध्यमातून प्राधिकरणाला आम्ही सर्व ती कागदपत्रे उपलब्ध करून देऊ. आम्ही सुद्धा गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अधिपत्याखालील किल्ल्यांचे संवर्धन करत आहोत. अनेक ठिकाणी स्मारके उभी करण्यास सुरुवात केली आहे. किल्ले संवर्धन आणि जतन यामध्ये आपलेही योगदान मोठे आहे. आपल्या अनुभवाचा लाभ गोवा सरकारला झाला तर आम्हाला आनंद होईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

Related Stories

कोल्हापूर : अज्ञाताने मारला बाण, वानराचे गेले प्राण!

triratna

‘ सीपीआर’ मध्ये कोरोना रूग्णांसाठी जंम्बो ऑक्सिजन टँक

triratna

सरकारतर्फे जिल्हा पंचायतीला 15 व्या वित्त आयोगातून 1 कोटी 40 लाख

Amit Kulkarni

कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर ओसरण्याची गती होतेय संथ

triratna

शिक्षकांचा थेट गावात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद

Omkar B

पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच

triratna
error: Content is protected !!