तरुण भारत

समिती नेते, कार्यकर्त्यांना नोटीसा

प्रतिनिधी/ बेळगाव

काळय़ादिनाच्या पार्श्वभूमिवर बेळगाव पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्त्यांवर दडपशाही सुरूच ठेवली असून नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकाऱयांमार्फत मराठीसाठीचे आंदोलन चिरडण्यासाठीचा खटाटोप सुरुच आहे.

Advertisements

शहर व उपनगरांतील अनेक कार्यकर्त्यांना शनिवारी नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. 1 नोव्हेंबर रोजी कोणत्याही आंदोलनात भाग घेवू नये, काळय़ाफिती बांधू नये, सायकल फेरी काढु नये, स्थानिक पोलिसांच्या परवानगी शिवाय कसल्याची प्रकारची मिरवणूक काढु नये, असे नोटीसीत म्हटले आहे.

अप्रिय घटना घडल्यास नेते, कार्यकर्त्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देतानाच कोणत्याही प्रकारचा बंद करु नये. सायकल फेरी काढु नये, फलक प्रदर्शित करु नये आदी सूचना नोटीसीत देण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत पोलीस अधिकाऱयांनी ही नोटीस काढल्याची माहिती मिळाली आहे.

Related Stories

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन मुले जखमी

Patil_p

दहावीच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात

Amit Kulkarni

आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी आरसीयू संघ रवाना

Amit Kulkarni

सन्नीधी चषक स्पर्धेत के. आर. शेट्टी संघ विजेता

Amit Kulkarni

राज्यातील जुन्या शाळा इमारतींची पुनर्बांधणी होणार

Amit Kulkarni

मुंबई येथील त्या घटनेचा बेळगावात दलित संघटनांकडून निषेध

Patil_p
error: Content is protected !!