तरुण भारत

ऑनलाईन पासपोर्ट काढणे झाले सोपे

एजंटांवर अवलंबून राहण्याची गरज नाही : 1500 रुपये ऑनलाईन शुल्क

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

परदेशात पर्यटनासाठी जाणाऱया प्रवाशांना पासपोर्ट महत्त्वाचा असतो. आपल्या देशातून इतर देशात जाण्यासाठी रीतसर देण्यात आलेली परवानगी म्हणजे पासपोर्ट. परदेशवारी करणे आता सर्वसामान्यांनाही शक्मय असल्यामुळे बाहेरच्या देशात जाणाऱयांची संख्या कमालीची वाढली आहे. यासाठी लागणारा पासपोर्ट काढणे आता अधिक सोपे झाले आहे. ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करून अवघ्या महिन्याभरात पासपोर्ट उपलब्ध होऊ शकतो. यासाठी एजंटांवर अवलंबून न राहता ऑनलाईन 1 हजार 500 रुपये भरून पासपोर्ट मिळविता येत आहे.

बेळगावमध्ये पासपोर्ट कार्यालय झाल्यापासून पासपोर्ट काढणाऱयांची हुबळीवारी बंद झाली आहे. कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयातच पासपोर्ट कार्यालय सुरू असल्याने त्या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. यापूर्वी रोज 100 व्यक्तींच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत होती. सध्या कोरोनामुळे यावर मर्यादा आली असून केवळ 25 लोकांनाच प्रवेश देण्यात येत आहे.

या ठिकाणी करा अर्ज

पासपोर्टसाठी www.passport.gov.in या वेबसाईटवर जावून पासपोर्टसाठी अर्ज करावा. पत्ता, नाव, आधार क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, स्थानिक पोलीस स्थानकाचे नाव, पिनकोड, वडिलांचे पूर्ण नाव दिल्यानंतर कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतात. संपूर्ण माहिती दिल्यानंतर पासपोर्ट केंद्रात कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तारीख देण्यात येते. त्या दिवशी कागदपत्रांची तपासणी करण्यात व स्थानिक पोलीस स्थानकातून चौकशी करण्यात येते.

Related Stories

बालक अपहरण प्रकरणी पाच जणांना अटक

tarunbharat

दत्तक बाळाचे पालकत्व आव्हानात्मक- आनंददायी

Patil_p

श्रीपंत महाराज पुण्यतिथी उत्सव साधेपणाने साजरा

Patil_p

किरण ठाकुर यांची ‘माय एफएम’ रेडिओवर मुलाखत

Patil_p

दोडवाड येथील ‘ती’ जमीन आम्हाला कसायला द्या

Amit Kulkarni

बॅरिकेड्स हटविण्यासाठी उद्या सत्याग्रह

Omkar B
error: Content is protected !!