तरुण भारत

राज्योत्सवासाठी शहरातील विविध चौकांत कमानी-रोषणाई

प्रतिनिधी/ बेळगाव

 कोरोनामुळे सर्व सण तसेच कार्यक्रमांवर बंदी असताना राज्योत्सवाच्या नावाखाली विविध चौकांमध्ये लाल-पिवळय़ा रंगाच्या कमानी, झेंडे आणि पताके लावण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisements

कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. यातच मागीलवर्षी आणि यावषीही पावसामुळे पूर आला होता. त्यामधून जनता सावरण्याचा प्रयत्न करत असताना सरकार मात्र राज्योत्सवाच्या नावाखाली पैसा उधळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बेळगाव शहराबरोबरच ग्रामीण भागातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  एकूणच कोरोनाच्या काळात सर्व कार्यक्रमांवर बंदी असताना राज्योत्सव मात्र साजरा करण्यासाठी आटापिटा सुरू असून सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Related Stories

दूध विक्रेत्यांना पोलिसांचा त्रास

tarunbharat

जिल्हय़ात 32 हजार 801 विद्यार्थ्यांचा पहिलीत प्रवेश

Patil_p

विनय युथ फौंडेशनचे दहा हजारांहून फुड पॅकेटचे वाटप

Amit Kulkarni

लॉकडाऊनमध्ये श्री होम्स अपार्टमेंटमधील रहिवाशांनी राबविले विविध उपक्रम

Patil_p

सांगा वाहने लावायची तरी कुठे?

Amit Kulkarni

स्मार्ट बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे

Amit Kulkarni
error: Content is protected !!