तरुण भारत

कोल्हापूर : पडण्याच्या भितीने भाजप प्रदेशाध्यक्ष पुण्यात

मंत्री उदय सामंत यांची चंद्रकांत दादांवर टिका

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात जनाधार नाही. त्यामुळे पडण्याच्या भितीने ते पुण्यातून निवडणूकीला उभे राहिले आणि निवडणून आले अशी टिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. भाजपला चीन व पाकिस्तानची घुसखोरी रोखता येत नाही मात्र बळाचा वापर करुन सिमावासीयांवर दडपशाही करुन कर्नाटकात जाण्यापासून रोखत असल्याची जहरी टिकाही सामंत यांनी केली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची कोल्हापूर जिल्हा शिवसेना संपर्कमंत्रीपदी निवड झाल्यानंतर रविवारी ते कोल्हापूर दौऱयावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, आदि उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले, बेळगांव मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथील भाजप सरकारने रातोरात हटविला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोठे होते. कोल्हापूरात त्यांना पडण्याची भिती होती. म्हणूनच त्यांनी पुण्याला पळ काढून पारंपारीक मतदार संघातून निवडणूक लढवली. भाजपला पाठित खंजीर खुपसण्याची पहिल्यापासून सवय आहे. ज्यावेळी मराठी माणूस अडचणीत असतो, मराठी माणसाच्या अस्मितेवर संकट येते त्यावेळी भाजपचे नेते कुठे असतात असा सवालही मंत्री सामंत यांनी उपस्थित केला.

Related Stories

चंदूरातील आत्महत्या हनीट्रॅपमधून ?

Abhijeet Shinde

अपुऱ्या कामामुळे निकमवाडी येथील रस्ता बनला धोकादायक

Abhijeet Shinde

गणेश विसर्जन प्रकरणी म्हालसवडेत पंधरा जणांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

वादळी वाऱ्यात उध्वस्थ झालेला किणी टोल नाका पुन्हा कार्यरत

Abhijeet Shinde

कागल तालुक्‍यासाठी 500 कोरोना बेडची व्यवस्था – मंत्री हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde

कुंभी कासारी कारखान्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर

Sumit Tambekar
error: Content is protected !!