तरुण भारत

कोडोलीत शेतातील शेडमधून जर्सी गाईची चोरी

वारणानगर / प्रतिनिधी

कोडोली (ता पन्हाळा ) येथील कोडोली – बोरपाडळे राज्य मार्गावर असलेल्या पोवार पानंद येथील शेड मधून सुमारे ३५ हजार किंमतीची जर्सी गायची रविवार दि. १ रोजी पहाटे चोरी झाली.

या चोरी बाबतची वर्दी अभिजीत पोवार यांनी कोडोली पोलिसात दिली आसून पोलिसातून मिळालेली माहिती अशी, अभिजीत पोवार यांच्या दोन जर्सी गाई शेतातील शेडमध्ये बांधल्या होत्या. शनिवारी रात्री त्यांना चारापाणी करुन व दुध घेवून ते घरी आले होते. रविवारी सकाळी सातच्या सुमारास शेतात गेले असता, दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांना दोनपैकी एक गाय शेडमध्ये नसल्याचे दिसून आले. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतु सापडली नाही. सदर गाय काळ्या पांढऱ्या रंगाची व शिंगे नसल्याच्या वर्णनाची आहे. कोडोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

वळीवडेत आणखी चार पॉझिटिव्ह एकूण संख्या सहावर

Abhijeet Shinde

पाच हजार विद्यार्थ्यांनी दिली `नीट’ परीक्षा

Abhijeet Shinde

सांगरुळ येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद

Abhijeet Shinde

कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये फूट

Sumit Tambekar

कोल्हापूर शहरात भटकी जनावरे पकडण्याची मोहीम सुरू

Abhijeet Shinde

102 व्या घटनादुरूस्तीमुळे निर्माण झालेला मराठा आरक्षण सुनावणीतील संभ्रम दूर करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!