तरुण भारत

पॅरीस मास्टर्स स्पर्धेतून थिएमची माघार

वृत्तसंस्था/ पॅरीस

पुढील आठवडय़ात खेळविल्या जाणाऱया एटीपी टूरवरील पॅरीस मास्टर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेतून ऑस्ट्रीयाचा टेनिसपटू डॉमिनिक थिएमने दुखापतीमुळे माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली. या स्पर्धेतून यापूर्वीच सर्बियाच्या जोकोव्हिचने माघार घेतली होती.

अलिकडेच थिएमने अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत जेतेपद मिळविले होते. सध्या व्हिएन्नामध्ये सुरू असलेल्या टेनिस स्पर्धेत थिएमला दुखापतीचा त्रास जाणवू लागल्याने त्याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. पॅरीस मास्टर्स टेनिस स्पर्धेत स्पेनच्या नदालला टॉप सीडिंग देण्यात आले आहे.

Related Stories

इजिप्तच्या पुरूष फुटबॉल संघाची महिला प्रशिक्षक

Patil_p

इंग्लंडविरुद्ध मालिकाविजय हे आमचे मुख्य लक्ष्य

Patil_p

वॉर्नने निवडलेल्या भारतीय संघाचा गांगुली कर्णधार

Patil_p

तिसऱया खेलो इंडिया युथ स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

Patil_p

आऊटडोअर ट्रेनिंगची परवानगी द्या : हिमा दास

Patil_p

थायलंडमधील स्पर्धेत कॅरोलिना मारिनचे दुसरे विजेतेपद

Patil_p
error: Content is protected !!