तरुण भारत

अभिनेता प्रणव पिंपळकरचा वैमानिक ते अभिनेता प्रवास सुरु

ध्येयपूर्तीचा ध्यास घेणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्या जीवनात उंच भरारी घेतो, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपली आवड जोपासण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि गगनभरारी चे स्वप्न पूर्ण करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता प्रणव पिंपळकर. आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैमानिक आणि आपली आवड पूर्ण करण्यासाठी अभिनय या दोन्ही बाजू उत्तम सांभाळत वैमानिक ते अभिनेता असा प्रवास प्रणवने गाठला आहे.

 वैमानिक असताना त्याला त्याच्या अंगी असलेली अभिनयाची आवड मात्र शांत बसू देत नव्हती आणि म्हणूनच त्याने अभिनयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. लवकरच प्रणव साई कमल प्रॉडक्शन निर्मित आलंय माझ्या राशीला या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक अजित शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणव या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय तो सुप्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुंवर यांच्या तरुणाईवर आधारीत इश्काचे क्वारंटाईन या गाण्यावर थिरकणार असून खंडेराया पडतो पाया आणि एका जबरदस्त मराठी रॅपमधून अभिनय आणि नफत्यकलेचा समतोल राखताना दिसणार आहे. प्रणवला अभिनेता प्रशांत दामले,प्रीतम पाटील, मंगेश देसाई, अभिनेत्री निर्मिती सावंत, अलका कुबल, संगीतकार अजय अतुल  यांसारख्या दिग्गजांकडून कायमच अभिनयाचे धडे मिळत आले आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली बऱयाच नाटकांतून त्याने आपली अभिनयाची आवड जोपासली. मात्र चित्रपटसफष्टीत आपले स्थान निर्माण करण्याचा ध्यास प्रणवला शांत बसू देत नव्हता या त्याच्या अंगी असलेल्या चिकटीमुळे प्रणवने वैमानिकाकडून अभिनेता बनण्याकडे आपला प्रवास वळविला आहे. विशेष म्हणजे वैमानिकाचे शिक्षण पूर्ण करून परदेशात नोकरीची उत्तम संधी असताना केवळ त्याचं पहिलं प्रेम असणाऱया अभिनयाच्या जोरावर त्याने चित्रपट सफष्टीत आपला ठसा उमटविण्याचा निर्णय घेतला.

Advertisements

Related Stories

ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी लवेंडर फार्म

Amit Kulkarni

लॉ ऑफ लव्हश्श् च्या मोशन पोस्टरची दमदार एन्ट्री

Patil_p

अभिनेत्री दीया मिर्झाला पुत्ररत्न

Patil_p

‘भारत बंद’ विरोधात कंगना म्हणाली…

Rohan_P

टायगर-दिशा संबंधी मुंबई पोलिसांच्या ‘त्या’ ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा

triratna

बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी केली आत्महत्या

Rohan_P
error: Content is protected !!