तरुण भारत

विषाणूमधील म्युटेशन युरोपमधील दुसऱया लाटेचे कारण

स्पेनमध्ये सुरू झालेले कोरोना विषाणूचे म्युटेशन (उत्परिवर्तन) युरोपमध्ये संक्रमणाच्या भयावह दुसऱया लाटेमागील कारण असू शकते असा दावा एका अध्ययनाद्वारे करण्यात आला आहे. विषाणूचा फैलाव आणि त्याच्या उत्परिवर्तनावर देखरेख ठेवणाऱया वैज्ञानिकांच्या एका आंतरराष्ट्रीय समुहाने 20एईयु1 नावाची आवृत्ती उन्हाळय़ानंतरपासून ब्रिटनमधील 90 टक्के प्रकरणांचे कारण असल्याचे म्हटले आहे.

 प्रत्येक विषाणूच्या म्युटेशनचे स्वतःचे जेनेटिक सिग्नेचर (आनुवंशिक हस्ताक्षर) असते. म्हणजेच उत्पत्ती झालेल्या ठिकाणाचा त्यातून शोध लावला जाऊ शकतो. सलग दुसऱया आठवडय़ात युरोपमध्ये 13 लाख रुग्ण सापडले आहेत. तज्ञांनुसार उत्तर स्पेनमध्ये एका शेतात 20ए.ईयु1 ला ट्रक करण्यात आले, हा विषाणू उन्हाळय़ाच्या सुटीनंतर परतणाऱया लोकांसोबत टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यावर खंडात पसरला आहे.

Advertisements

विमानतळ आणि सीमांवर उत्तम स्क्रीनिंगद्वारे संक्रमणाची ही दुसरी लाट रोखता आली असती का हा प्रश्न उपस्थित होत आहे. विषाणूचे हे म्युटेशन स्पेनमध्ये 80 टक्के, आयर्लंडमध्ये 60 टक्के आणि स्वीत्झर्लंड तसेच फ्रान्समधील 40 टक्क्यांपर्यंतच्या संक्रमणामागील कारण असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे.

फ्रान्स, जर्मनी, स्पेनमध्ये नवे रुग्ण

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशव्यापी टाळेबंदी घोषित केली असून ती किमान पूर्ण नोव्हेंबरमध्ये लागू राहणार आहे. विषाणू जसजसा फैलावत जातो, त्यांच्यात स्वाभाविकपणे म्युटेशन होते, कोविड-19 फैलावणाऱया सार्स-कोव2 या विषाणूचे शेकडो प्रकार आहेत, जे पूर्ण युरोपमध्ये फैलावत आहेत. परंतु यातील केवळ अत्यंत कमी वेरिएंट इतक्या यशस्वीपणे फैलावले आहेत, जे ओळखण्यात आलेल्या या नव्या विषाणूच्या स्वरुपात प्रचलित झाले असेल.

स्वीत्झर्लंड आणि स्पेनमधील वैज्ञानिक पथकांनी 20ए.ईयु1 विषयी सर्वप्रथम सतर्क केले आहे. हा विषाणू अन्य प्रकारांच्या तुलनेत अधिक घातक किंवा संक्रामक आहे का हे तपासण्याच्या दिशेने वेगाने काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नव्या विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये एक विशेष म्युटेशन होते, ज्याद्वारे सार्स-कोव-2 मानवी पेशींवर आक्रमण करतो अणि या म्युटेशनने ही प्रक्रिया सोपी केली असण्याची शक्यता असल्याचे वैज्ञानिक म्हणत आहेत.

Related Stories

‘नासा’च्या रोव्हरचे मंगळावर यशस्वी लँडिंग

Patil_p

ब्राझीलमध्ये 55 लाख रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav

10 हजार किमीवरून ‘अमेझॉन’ला बळ

Patil_p

जगभरात कोरोनाचे 26 लाख बळी

datta jadhav

मालीत दहशतवादी हल्यात 31 नागरिक ठार

Patil_p

लिबियात सात भारतीयांचे अपहरण

datta jadhav
error: Content is protected !!