तरुण भारत

प्रवास सागरच्या चित्रकलेचा

आडपईहून  ..हैद्राबादमार्गे  थेट जर्मनी

महेश गावकर / फोंडा

Advertisements

कोरोना महामारीच्या सावटात यंदा नवरात्रोत्सवाचे नवरंग बरसलेच नाही, मात्र आडपई येथील एका उदयोन्मुख चित्रकाराने नवरात्रोत्सवात कावी आर्टच्या माध्यमातून एकाहून एक सरस चित्रे रेखाटून गाभाऱयातील देवीचे दर्शन कोरोनाकाळात घरी बसलेल्या सामान्यापर्यंत पोचविले. या चित्रांना सोशलमिडीयावर सद्या धूम घातली आहे. देवीच्या चित्रांमुळेच तो आज पुन: प्रकाशझोतात आलेला आहे. आजच्या घडीला आर्ट गॅलरी व स्टुडीओची त्याची ऐपत नसून त्यांनी आडपई येथील आपले घरच स्टुडीओत रूपांतर केलेले आहे. आडपईहून…. जर्मनीपर्यंत त्याची ख्याती पोचलेली असून आज तो युवा शिल्प व चित्रकारांचा रोल मॉडल बनला आहे. आडपई गावातून थेट जर्मनीपर्यंत झेप घेतलेला तो चारचौघा कलाकारांसारखाच  एक मनस्वी कलाकार आहे सागर सुरेश नाईक मुळे. पोस्ट आडपई.

संघर्षाचा काळातही तो कुटुंबाची पुर्ण जबाबदारी स्वीकारून हे काम करीत आहे. कंगोरे केस, हातात माळा, कानात बीनी, गळय़ात स्कार्फ अशा पेहरावात  वावरण्याची त्याची स्टाईल असून हीच जणू त्याची आज सोशल मिडीयावर ओळख बनली आहे. स्लक्प्चर, पिंट मेकींग, पेटींग, फोटोग्राफि व चित्रकला यात तो पारंगत आहे, मात्र त्याला सर्वाधिक आवड व सेल्फ पोट्रेट व स्लक्प्चर हाच त्याचा आवडीचा प्रांत असून त्याची चित्रांची भूक दिवसेंदिवस वाढत आहे. शिल्पकलेच्या कलेमुळे त्याची कला आज आडपईहून थेट जर्मनीपर्यंत पोचलेली आहे. या प्रवासात त्याला अनेक शिष्यवृत्त्या, पारितोषिके प्राप्त झालेली असून अनेक स्पर्धात परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.

संपुर्ण घराचे केलंय स्टुडीओत रूपांतर

इवल्याश्या मुंगीने एका सुंदर वारूळाची निर्मिती करावी तशा क्रिएटिवीटीचे ज्ञान सागर यांनी साकार केलेल्या शिल्पकला, पेंटींगात दिसून येते. सागर नाईक हा मध्यमवर्गीय कुटूंबातील अस्सल आडपईकर आहे. त्यांने रेखाटलेल्या आपल्या पहिल्या आठवणीच्या चित्राबाबत सांगताना आपण स्वत: दर्याकिनारी उभा मोचवी व होडय़ाची रेलचेल न्याहाळतानाचे रेखाटलेले चित्र डोळयासमोर कायम तरळत असल्याचे सांगतो. चित्रकलेचे प्राथमिक तंत्र, सिद्धांताचे बाळकडू त्याच्या रक्तात असून आडपईतील  पाच दिवस गणेशोत्सवात पिढयातपिढया चित्ररथ साकारण्याची परंपरेचाही महत्वाचा वाटा आहे. गणेशोत्सवात आडपईच्या छोटया गल्लीतून वाट सुटण्याऐवढे चित्ररथ बनविणे अपरीहार्य असायाचे. छोटय़ा चित्ररथातून मोठी शिकवण घेत येथूनच त्याच्या चित्रकलेची श्रीगणेशा झाला. शब्दाविना कळणारी मनं, चित्र व चित्रकाराची आपसात असलेली मैत्री असा दृष्टीकोन प्रत्येक चित्रकाराला असणे अंत्यत आवश्यक असल्याचे सागर म्हणतो.

आडपई ते थेट जर्मनी-शेवटच्या श्वासापर्यंत फक्त चित्रकार

मातीमध्ये काम करण्याचा प्रवास चित्रकलेतून होतो. चित्रकला चांगली असेल तर कलेच्या कोणत्याही प्रांतात यशस्वी होता येते. सागर यांनी आजपर्यत 60 हून अधिक शिल्पे तयार केलेली आहेत. कलेचा खरा हिशेब कागदावर नव्हे शरीरावर दिसून येतो. जे अनुभवले, खाल्ले, पचले, रक्तात मुरले तेच खरे शिक्षण हीच शिकवण घेत संपुर्ण कुटुंबाचा डोलारा सांभाळत आपले कलेची साधना करीत आहे.

 पाहिल्या पाहिल्या कुणाचाही कायमचा आठवणीत राहणारा सागर यांने रेखाटलेल्या एकाहून एक सरस पेंटींगसमुळेच. त्याच्या चित्राच्या अनुभवातून त्यानी जणू आपली कथाच स्टुडीओत बंदिस्त केलेली दिसते. जर्मनी येथे पोचलेल्या चित्राबाबत तो बोलतो की अजून मी फार शिल्पे केलेली नाही, तरीही माझ्या शिल्पाची निवड झाली हा सन्मान वाटतो. अशा कौतुकामुळे कलेच्या वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळते. आजपर्यंत मारलेली मजल यात अवॉर्डचा महत्चाचा वाटा आहे.

सागरने असाही नैराश्येचा काळ अनुभवला असून या अवस्थेत आडपईचेच सुपुत्र चित्रकार विराज नाईक यांनी दिलेला गुरूमंत्र व सकारात्मक विचार हेच आपण थोडेमात्र मिळवलेल्या यशाचे गमक असल्याचे तो अभिमानाने सांगतो. श्रीपाद गुरव व मधू नाईक यांचे मार्गदर्शन, तसेच आमदार सुदिन ढवळीकर यांचे सहाय्य कायम स्मरणात ठेवलेले आहे.

बॅचलर्स व मास्टर्सनंतर चित्रकलेची दिशा बदलली

 दिवसेंदिवस निरपेक्ष भावनेने कलाक्षेत्रातील विविध पैलू वृद्धिगत होण्यासाठी अविरत श्रम घेणाऱया सागरने गोवा कॉलेज ऑफ फाईन आर्टमधून बॅचलर्स पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर हैद्राबाद येथील सरोजिनी नायडू कॉलेज ऑफ फाईन आर्ट मधून मार्स्टस केलेले आहे. त्याशिवाय रेसिडन्सी अभ्यासक्रम पुर्ण केलेला आहे. गोवा सरकराच्या कला व संस्कृतीच्या रू 1 लाखाच्या शिष्यवृत्तीतूनच शिक्षण घेता आले. मास्टर्सच्या काळातील शिक्षणातून चित्रकलेची दिशा बदलली, सेल्फ पोट्रेट व इतर कलाकृतीची समज यावेळीच उमजल्याचे तो म्हणतो.   

नवरात्रोत्सवात कावी आर्टमूळे पुन: लाइमलाईटमध्ये

नवसाला पावणाऱया गोव्यातील प्रमुख देवीच्या मुर्ती नवरात्रोत्सवात साकारल्या. बांदोडय़ाची महालक्ष्मी, मडकईची श्री नवदुर्गा, शिरगांवची देवी लईराई, फातर्पाची कुंकळळीकरीण व फातर्पेकरीण, म्हार्दोळ येथील महालसा नारायणी, शिरोडय़ाची कामाक्षी, कवळेची शांतादुर्गा व ढवळी येथील देवी भगवती यांच्या साकारलेल्या कलाकृतीमुळेच पुन: प्रकाशझोतात आलेला आहे. 

प्रत्येक कलाकाराचा सुरवातीचा काळ हा या-ना-त्या नात्याने संघर्षकाळच असतोच. कलेच नुसतं एप्रिसिएशन नको, कलाकृतीबद्दल विचारही केला पाहिजे. चित्रकला हा आपला श्वास असून आजच्याघडीला कुठही नोकरी करायची नसून नोकरी केल्यास श्वास गुसफटण्याची शक्यता असते. त्यामुळे मोकळा श्वास घेत सतत आपल्या कलेला ऑक्सिजन पुरविणे हीच आपली ईच्छा असल्याचे सागर  सांगतो. फॅमिली व कला यांची सांगड घालत काहीही झालं तरी हार मानण्याची नाही, हे त्यानी ठरविलेले असून मिळेल त्या संधीच सोनं करायच असा चंग बांधलेला आहे. आडपई गावचं नाव जगाच्या नकाशावर पोचविणे हेच आपले ध्येय आहे.

शिल्पकार व्हायचे असेल तर आधी चित्रकार व्हा!

  आज आर्ट ही फॅशन झालेली आहे. चित्रकलेची ओढ असलेल्या कलाकारांनी   इन्स्टंट यशस्वी होण्यासाठी शार्टकट शोधू नये, जर तुम्हाला शिल्पकार व्हायचे असेल तर आधी चित्रकार व्हा, शिल्पकलेत करिअर करण्यासाठी खूप मेहनत लागते. कोणत्याही कलेत यश मिळवणे हे एघाद्या तपश्चर्येपेक्षा कमी नसून त्यात  प्राविण्य मिळवण्यासाठी मोठय़ा क्षमतेची व सातत्याची आवश्यकता आहे. पण एकदा तुम्ही स्वत:ला सिद्ध केले, की हीच कला तुम्हाला मोठा आनंद देईल, व तुमचे काम तुमची ओळख बनेल. यावेळी सागरने आपली लाईव्ह चित्रे व शिल्पकलेचे साहित्य आपली ओळख बनत असल्याचे सांगितले.

 आज गोव्यात चित्रकला व आर्ट गॅलरीला दुय्यम स्थान दिले जात असून संगीत रजनीला नाटय़क्षेत्रात बेसुमार प्रसिद्धी व महत्व दिले जाते अशी खंत त्यानी व्यक्त केली आहे. तरीही झपाटय़ाने होत असलेल्या सोशियल मिडीयामुळे चित्रकारांना संजीवनी मिळत आहे.

Related Stories

पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणी उद्या सुनावणी

Patil_p

गोवा – दिल्लीचे वीजमंत्री 26 रोजी आमने-सामने

Amit Kulkarni

कला अकादमीत नियम धाब्यावर बसवून बढत्या

Omkar B

आगामी निवडणुकीचा विचार करून गोव्यातील लसीकरणास प्राधान्य हवे

Amit Kulkarni

रामनाथ पंढरी गावडे यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार

Amit Kulkarni

मडगावात तृणमूलची पकड मजबूत : फालेरो

Amit Kulkarni
error: Content is protected !!