तरुण भारत

सोशल मिडियावर बदनामी करणाऱया पत्नीविरुध्द तक्रार

प्रतिनिधी/सातारा

बारामती ते सातारा प्रवासादरम्यान पतीशी भांडण झाल्यावर पत्नीने पतीचा मोबाईल घेतला. पतीच्या मोबाईल हँडसेटचा वापर करुन त्याचे इन्स्ट्राग्राम अकौंट खोलून त्यावर सासू व तिच्यासोबत इतर महिलांचे अश्लिल फोटो टाकून त्या खाली सासूचा मोबाईल क्रमांक टाकत त्यांची बदनामी केली. याबाबत तिच्या पतीने तक्रार दाखल केल्यावर पत्नीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार जयदेव राजेंद्र भालेराव (रा. शाहूपुरी, सातारा) व त्यांची पत्नी भाग्यश्री दिलीप शिवणकर (रा. बारामती) हे दि. 28 रोजी साताऱयाकडे येत होते. त्यावेळी प्रवासात त्यांचे भांडण झाले. त्यावेळी भाग्यश्री हिने पतीचा मोबाईल घेवून तिच्याकडे ठेवला होता. त्यानंतर भांडणाच्या रागातून भाग्यश्री हिने पती जयदेव याच्या इस्ट्राग्राम अकौंटचा वापर करत त्याच्यावर सासूसोबत इतर महिलांचे अश्लिल फोटो टाकले. त्या खाली  मी संगिता, फेक आंटी कॉल मी असे लिहून त्यावर सासूचा मोबाईल क्रमांक टाकला.

त्यानंतर भाग्यश्री हिने सदरची पोस्ट डिलिट करुन त्यावर फालोअर्स रिमूव्ह केले आहे. या प्रकारामुळे माझी व माझ्या आईची बदनामी झाली असल्याची तक्रार जयदेव भालेराव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी भाग्यश्री शिवणकर हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.

Related Stories

सातारा : किसनवीर साखर कारखान्याच्या सभासद, शेतकरी, कामगारांच्या गळ्याचा आर्थिक फास सोडवा

Abhijeet Shinde

अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

Rohan_P

शिवसेना प्रवक्त्यांची नवीन यादी; संजय राऊत, अरविंद सावंत सेनेचे मुख्य प्रवक्ते

Abhijeet Shinde

पेठ वडगाव : अर्धवट गटार बांधलेले ठेकेदार व संबंधित अधिकार्यांच्या कामाची चौकशी करा

Abhijeet Shinde

सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा; वाढदिवशी पोस्ट केला होणाऱ्या पतीसोबतचा फोटो

Abhijeet Shinde

धामणी खोऱ्यात सापडले दोन कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!