तरुण भारत

सांगलीतील आणखी 46 एसटी कर्मचार्‍यांना कोरोना बाधा

प्रतिनिधी / सांगली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील “बेस्ट’ च्या प्रवासी सेवेसाठी सांगली विभागातून 425 जणांची पहिली तुकडी 10 ऑक्टोबरला गेली होती. ही पहिली तुकडी 23 ऑक्टोबरला परतली. त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये तब्बल 127 जण कोरोनाबाधित आढळले.

त्यामुळे दुसरी तुकडी परत बोलावण्यात आली. त्यामुळे सांगली आगारातील कर्मचारी व गाड्यांची सेवा 31 ऑक्टोबरपासून स्थगित केल्याचे जाहीर केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात परतलेल्या 400 जणांपैकी तीनशे जणांची कोरोना निदान चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 46 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सांगलीतील 40 जणांचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे. तसेच इस्लामपुरातील 48 जणांची तपासणीच झालेली नाही. त्यांना स्वतःच चाचणी करून घेण्यास अधिकार्‍यांनी सांगितले आहे. त्यामुळे अजूनही शंभर जणांचा अहवाल प्रलंबित आहे. एसटीच्या पहिल्या तुकडीतील 127 आणि दुसऱ्या तुकडीतील आज अखेरचे 46 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. सुमारे 173 कर्मचारी बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगारनिहाय बाधित कर्मचारी- तासगाव 9, शिराळा 5, विटा 9, जत 8, मिरज 6, पलूस 1 व कवठेमहांकाळ 8 याप्रमाणे 46 जण बाधित असल्याचे आढळून आले आहेत.

Related Stories

इस्लामपुरची महिला किल्ले मच्छिंद्र गडावर अपघातात ठार

Abhijeet Shinde

मिरजेत ओढ्याला पूर, घरांमध्ये शिरले पाणी

Abhijeet Shinde

पैशांऐवजी विद्यार्थ्यांना धान्य स्वरूपात मदत करा

Abhijeet Shinde

शेतकरी,व्यापारी स्नेहभेटीची अठरा वर्षांची परंपरा कायम

Abhijeet Shinde

सांगली : बेडग येथे शेतजमिनीच्या वादातून वृध्देचा खून

Abhijeet Shinde

सांगली : पोलिसाचा महाविद्यालयीन तरुणावर अनैसर्गिक अत्याचार

Sumit Tambekar
error: Content is protected !!