तरुण भारत

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधाचा तुटवडा

कुत्र्याच्या हल्ल्यांतील जखमींना उपचाराविना पाठविले परत

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चौघा जणांवर उपचार न करता त्यांना परत पाठविल्याची घटना सोमवारी घडली असून त्यामुळे बिम्स्च्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथे भटक्मया कुत्र्याच्या हल्ल्यात व तीन लहान मुले असे एकूण चार जण जखमी झाले आहेत. यामध्ये घरासमोर खेळणाऱया दीड, पाच व आठ वषीय मुलांचाही समावेश आहे. लहान मुलाच्या गालाचा चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

महिला व लहान मुलांना उपचारासाठी सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलला आणण्यात आले. सर्पदंश किंवा कुत्र्याच्या हल्ल्यानंतर जखमींना उपचारासाठी जखमींना सिव्हिलला हलविण्यात येते. जखमी सिव्हिलला पोहोचले त्यावेळी उपचारासाठी आवश्यक इंजेक्शन नसल्याचे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले.

त्यामुळे नाईलाजास्तव जखमी उपचारासाठी खासगी इस्पितळात पोहोचले. सध्या सिव्हिल हॉस्पिटल कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तरीही अपघात, हाणामारीतील गंभीर जखमींवर उपचारांची सोय आहे. सर्पदंश व श्वानदंशावर आवश्यक लस नसल्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे.

Related Stories

आमदार बेनके यांच्याकडून सरकारी शाळांची पाहणी

Patil_p

बेळगावमधील चौपदरी रिंगरोड प्रकल्पाला गती

Amit Kulkarni

कोणत्याही परिस्थितीत बायपाससाठी एक इंचही जागा देणार नाही

tarunbharat

खानाप़रातील विद्यार्थी वसतिगृहात क्वॉरंटाईन नको

Patil_p

गांधीनगर येथे जैन मंदिरात चोरी

Amit Kulkarni

बार असोसिएशन निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे

Amit Kulkarni
error: Content is protected !!