तरुण भारत

बॅरिकेड्सचा विळखा ठरतोय पादचाऱयांना तापदायक

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरात स्मार्ट रस्ते, स्मार्ट सिग्नल सुविधा आणि स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र, विविध चौकातील बॅरिकेड्सचा विळखा सुटता सुटेनासा झाला आहे. परिणामी वाहनधारकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. राजेंद्र प्रसाद चौकातील बॅरिकेड्सच्या विळख्यातून मार्ग काढताना पादचाऱयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Advertisements

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना वाहनधारकांसाठी मात्र गैरसोयीची ठरत आहे. विविध चौकात होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास रहदारी पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध चौकात ट्राफिक सिग्नल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र ही सुविधा कार्यान्वित झाली नसल्याने राजेंद्र प्रसाद चौकात वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी रहदारी पोलिसाची नियुक्ती करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आवश्यक आहे. पण रहदारी पोलिसांची नियुक्ती केवळ दंडात्मक कारवाईसाठी करण्यात येत असल्याने चौकात रहदारी पोलीस नसतात. त्यामुळे या चौकात वाहतूक कोंडी होत आहे. शहराच्या पश्चिम भागातील नागरिक बेळगाव-वेंगुर्ला मार्गाने शहरात प्रवेश करीत असतात. या ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्याऐवजी बॅरिकेड्स लावून वाहनधारकांसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱया वाहनधारकांची गैरसोय होत आहे. समादेवी गल्लीत तसेच किर्लोस्कर रोडला जाण्यासाठी पश्चिम भागातून येणाऱया वाहनधारकांना आरएलएस कॉलेज समोरून वळसा घालून जावे लागत आहे. पण पादचाऱयांना ये-जा करण्यासाठी सोडण्यात आलेल्या जागेमधून दुचाकी वाहनधारक जात असल्याने बॅरिकेड्स लावून पादचाऱयांचा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहनधारकांना त्रास होत आहे. बॅरिकेड्सच्या विळख्यामुळे पादचाऱयांना गैरसोयीचे बनले आहे. रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आल्याने बॅरिकेड्सच्या विळख्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेषत: बाजार घेऊन जाणाऱया नागरिकांना तसेच वृद्ध व महिलावर्गाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. बॅरिकेड्समुळे कॉलेज रोडवरून ये-जा करणारी वाहने भरधाव वेगाने जात असल्याने पादचाऱयांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रहदारी विभागाच्या वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी या प्रकरणी लक्ष घालून राजेंद्र प्रसाद चौकातील बॅरिकेड्स हटवून ट्राफिक सिग्नल सुविधा सुरू करून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी होत आहे. 

Related Stories

20 हजार पेंडी गवत आगीच्या भक्ष्यस्थानी

Patil_p

कायदा विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच

Amit Kulkarni

शिक्षणात राजकारण आणू नका; कर्नाटक उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

Sumit Tambekar

हुतात्मा राहुल भैरू सुळगेकर यांच्या पुतळय़ाचा आज अनावरण समारंभ

Amit Kulkarni

सामाजिक उपक्रमांमधून साजरी होणार ऐतिहासिक शिवजयंती

Patil_p

मंडोळी हायस्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

Amit Kulkarni
error: Content is protected !!