तरुण भारत

खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदासाठी उद्या निवडणूक

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदासाठी बुधवार दि. 4 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ठेवण्यात आली आहे. आलेल्या अर्जांतून निवड करण्यासाठी दुपारी 3 वाजता नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली आहे.

Advertisements

खानापूर नगरपंचायतीची निवडणूक 31 ऑगस्ट 2018 रोजी झाली होती. निवडणुकीचा निकाल 3 सप्टेंबर रोजी लागला होता. यानंतर काही दिवसातच नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. पण आरक्षणाला स्थगिती आल्याने नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली नाही. यानंतर दोन वेळा जाहीर झालेल्या आरक्षणालाही उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने निवडणूक होऊच शकली नाही. शेवटी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नव्याने आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानुसार नगराध्यक्ष पद सामान्यासाठी तर उपनगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आले. यानुसार दोन्ही पदांसाठी 21 ऑक्टोबर रोजी निवडणूक जाहीर झाली. पण दोन दिवस आधी पुन्हा उच्च न्यायालयाची स्थगिती आल्याने निवडणूक होऊ शकली नाही. पण गुरुवार दि. 22 ऑक्टोबर रोजी ती स्थगिती उठली. दि. 10 नोव्हेंबरपूर्वी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला. त्यानुसार आता बुधवार दि. 4 नोव्हेंबर रोजी निवडणूक जाहीर झाली आहे. नगराध्यक्षपद सामान्यासाठी आल्याने 19 पैकी 18 नगरसेवक ती निवडणूक लढवण्यास पात्र आहेत. पण या आधी नगराध्यक्ष पदासाठी मजहर खानापुरी व नारायण मयेकर यांचे प्रयत्न सुरू होते. यावरून दोन गटही पडले होते. पण यामध्ये पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दोन्ही गटांना बोलावून निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला दिला व दोन्ही गटांनी एकत्र येऊन नगरपंचायतीचा कारभार चालवावा, पालकमंत्री या नात्याने खानापूर शहराच्या विकासासाठी माझ्याकडून सर्व प्रकारचे सहकार्य देऊ, अशी ग्वाही दिली. यामुळे आता नगराध्यक्ष निवडीवरून होणारी कटुता टाळण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता असून त्यासाठी मजहर खानापुरी यांचेच नाव आघाडीवर आहे. उपनगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आल्याने या पदासाठी लक्ष्मी बसलिंग अंकलगी या एकमेव महिला पात्र असल्याने त्यांची निवड निश्चित आहे. दरम्यान, पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी अंतिम निर्णय घेण्यासाठी सर्व नगरसेवकांना पुन्हा सोमवारी गोकाकला बोलावून घेतले होते. पण तेथे कोणता निर्णय झाला हे समजू शकले नाही. 

Related Stories

गणित विषय शिक्षकांची कार्यशाळा

Patil_p

कारवार जिल्हय़ात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू

Patil_p

कर्नाटक: राज्यात बेंगळूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

Abhijeet Shinde

फसल विमा योजनेचा शुभारंभ

Amit Kulkarni

कुपोषित बालकांची संख्या घटविण्यासाठी प्रयत्न करा

Patil_p

शिवसेनेमुळे महाजन अहवाल गाडला गेला

Patil_p
error: Content is protected !!