तरुण भारत

अफगाणिस्तान : कंदहारमध्ये 175 तालिबानींना कंठस्नान

ऑनलाईन टीम / काबुल : 

कंदहार प्रांतातील अरघांदाब जिल्ह्यात सुरक्षा दल आणि तालिबानी दहशतवाद्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीनंतर अफगाण सैन्याने केलेल्या हल्ल्यात 175 दहशतवादी मारले गेले असून, 26 जण जखमी झाले आहेत. एका वृत्तसंस्थेने अफगाण सुरक्षा दलातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. 

Advertisements

अफगाण सुरक्षा दलाने कंदहार प्रांतात तालिबान्यांच्या विरोधात कारवाईची जोरदार मोहीम राबवली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानच्या सैन्याने सोमवारी रात्री तालिबानी अड्डयांवर हवाई हल्ले आणि थेट तोफांचा मारा केला. त्यामुळे या हल्ल्यात 175 तालिबानी ठार झाले. तर 26 जण जखमी झाले. 

अफगाण सैन्याच्या हल्ल्यात तालिबानचे 7 कमांडरही मारले गेले आहेत. मात्र, या चकमकीदरम्यान तालिबानचे फार कमी नुकसान झाल्याची प्रतिक्रिया तालिबानच्या प्रवक्‍त्याने दिली आहे.

Related Stories

मलेशियाशी वाद : इडली-डोसाचे दर वाढणार

Patil_p

कोरोना विषाणूचा खुलासा, महिला पत्रकार तुरुंगात

Patil_p

2020 मध्ये भारतात 8,927 तास बंद राहिले इंटरनेट

Patil_p

मालदीव 15 जुलैपासून पर्यटकांसाठी खुले

datta jadhav

85 वर्षे जुनी वृत्तसंस्था होणार बंद

tarunbharat

हेलिकॉप्टर अपघातात अलास्कामध्ये 5 ठार

Patil_p
error: Content is protected !!