तरुण भारत

सॅमसंगतर्फे संतोष दरेकर यांचा गौरव

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना काळात अनेक कोरोना रुग्णांची मदत करणे, घरी उपचार घेणाऱया रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर पुरविणे, तातडीने रक्त उपलब्ध करून देणे या संतोष दरेकर यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन संयुक्त महाराष्ट्र चौकातील सॅमसंग स्मार्ट फोन कॅफेतर्फे त्यांना एम 31 हा स्मार्टफोन देऊन गौरविण्यात आले आहे.

Advertisements

संतोष दरेकर हे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख असून कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदत केली आहे. याच काळात रक्तदान शिबिरे न झाल्याने अनेकांच्या शस्त्रक्रियेसाठी डायलिसेससाठी रक्त मिळणे कठिण झाले. अशावेळी संतोष दरेकर यांनी आपल्या अनेक सहकाऱयांसमवेत रक्तदान करून रक्त संकलन केले. घरीच उपचार घेणाऱया रुग्णांना तातडीने ऑक्सिजन सिलिंडर्स उपलब्ध करून दिले.

या सर्व कामाची नोंद घेऊन कोरोना योद्धा म्हणून सॅमसंग कंपनीने त्यांना फोन देऊन गौरविले.

या शोरुमचे प्रवर्तक भारत राठोड, पूर्वी बेळगावला असणारे व सध्या बागलकोट येथे सेवा बजावत असलेले पोलीस निरीक्षक विजय मुरगुंडी यांच्या हस्ते हा फोन देण्यात आला. यावेळी भारत राठोड, कुणाल जैन, मुजीम बाडवाले, अबुझार संगोळ्ळी, इम्रान सौंदत्ती आदी उपस्थित होते. 

Related Stories

बेळगाव दक्षिण विभागात ग़्17 ठिकाणी अबकारी छापे

Omkar B

मार्केट पोलिसांकडून हमालांना मास्कचे वाटप

Amit Kulkarni

पितळ वितळविण्याच्या कारखान्यामुळे कर्करोगाचा शिकार

Omkar B

येळ्ळूरमध्ये आजपासून कडक अंमलबजावणी

Amit Kulkarni

किरण जाधव यांच्या कार्यालयात भाजप स्थापना दिन साजरा

Amit Kulkarni

जातीय तेढप्रकरणी चौघांना जामीन

Amit Kulkarni
error: Content is protected !!