तरुण भारत

रियलमीने विकले 5 कोटी स्मार्टफोन्स

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रियलमी या कंपनीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालामध्ये गेल्या 9 तिमाहीमध्ये 5 कोटींपेक्षा जास्त स्मार्टफोन्सची विक्री करण्यात यश मिळवले असल्याचे म्हटले आहे. ही विक्री 2018 च्या तिसऱया तिमाहीपासून ते 2020 च्या तिसऱया तिमाहीपर्यंत नोंदली गेली आहे. इतक्या मोठय़ा संख्येने स्मार्टफोन्स विक्री करणाऱया रियलमीने सर्वात आघाडीवरची कंपनी म्हणून नोंद केली आहे. तिमाही स्तरावर कंपनीने 1.48 कोटी इतके स्मार्टफोन्स विक्री करून नवा इतिहास रचला असल्याचे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे तिसऱया तिमाहीत सर्वात जलद रीतीने स्मार्टफोन्स विकण्यातही कंपनी अव्वल ठरली आहे. सर्वात वेगाने या कंपनीची लोकप्रियता वाढत असल्याचे म्हटले आहे.

Advertisements

ग्राहकांचा स्मार्टफोन्सना वाढता प्रतिसाद- सीईओ माधव सेठ

ग्राहकांकडून रियलमीच्या स्मार्टफोन्सना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एक लोकप्रिय ब्रँड म्हणून रियलमीची ओळख होते आहे. या वाढत्या पसंतीमुळे कंपनीचे उत्तरदायित्व येणाऱया काळात आणखी वाढणार आहे. नव्या लॉन्च केलेल्या स्मार्ट फोनबाबत उत्पादकांकडे लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया पोहोचवल्या आहेत. त्यामुळे कंपनीचा विश्वास अधिकच वाढलेला दिसतो आहे, असे रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

विवो वाय 20 लवकरच भेटीला

Patil_p

पुढच्या वषी येणार आयफोन-13

Patil_p

मायक्रोसॉफ्टचे तेलंगणात मोठे डाटा केंद्र

Amit Kulkarni

मोटोरोलाचा वन फ्यूजन प्लस बाजारात

Patil_p

चिनी मोबाईल कंपन्यांचे उत्पादन घसरले

Patil_p

‘एअरपॉड मॅक्स’चे ऍपलकडून लाँचिंग

Omkar B
error: Content is protected !!