तरुण भारत

हॉस्पिटॅलिटी क्षेत्र येतंय पूर्वपदावर

सप्टेंबरमध्ये प्रमाण 10 ते 12 टक्के अधिक: येणाऱया काळात प्रमाण वाढणार

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisements

महिना दर महिन्याचा आढावा घेतल्यास हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. हॉटेलमध्ये राहणाऱयांचे (लॉजिंग) प्रमाण ऑगस्टच्या तुलनेमध्ये सप्टेंबरमध्ये वाढले असल्याचे दिसून आले आहे. मागच्या वषीच्या तुलनेत मात्र राहणाऱयांचे प्रमाण 60 टक्यांपेक्षा खाली आले आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला होता.

देशभरातील विविध हॉटेलमध्ये राहणाऱयांचे प्रमाण सप्टेंबरमध्ये 10 ते 12 टक्के इतके वाढले आहे. दिवसाच्या सरासरी रूमच्या भाडय़ामध्येही 2 ते 4 टक्के इतकी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे महसूलही प्रति रूमप्रमाणे 12 ते 14 टक्के इतका वाढला आहे. गोवा आणि जयपूर या दोन शहरांनी हॉटेल व्यवसायात सुधारणा दर्शवली आहे. आरामदायी लक्झरी हॉटेलमध्ये राहण्याचे प्रमाण या दोन शहरांमध्ये अधिक दिसून आले आहे. अनेकांनी दोन ते तीन दिवसांची ट्रिप या शहरांमध्ये केली असल्याचे दिसले आहे. वर्षाच्या तुलनेमध्ये पाहता प्रति रूममागचा महसूल मात्र 72 टक्के इतका घटला आहे.

येणाऱया उत्सवाच्या काळामध्ये पर्यटनासाठी आणि हॉटेलमध्ये राहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पर्यटक बाहेर पडतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे यापुढे या क्षेत्राची वाटचाल गतीने होताना दिसेल, असा अंदाजही सांगितला जात आहे. अनेकांनी दक्षिण आणि उत्तर भारत ही दोन क्षेत्रे आगामी पर्यटनासाठी निवडली आहेत. कोरोनामुळे गेले कित्येक महिने घरात अडकून पडलेल्या अनेक कुटुंबीयांनी छोटेखानी ट्रिप आखली आहे.

इतर देशांतही फटका

दुसरीकडे सप्टेंबरमध्ये चीनमध्येदेखील हॉटेलमध्ये राहणाऱयांचे प्रमाण दोन टक्क्मयांनी घसरले आहे. पाठोपाठ सिंगापूर आणि मलेशियातही हे प्रमाण अनुक्रमे 8 आणि 38 टक्के इतके कमी झाले आहे.

Related Stories

जियोचे दर डिसेंबरपासून वाढणार

Patil_p

इंडिगोची वेतन कपातीची घोषणा

tarunbharat

सिंगापुरी डॉलर नोट रद्दचा निर्णय

Omkar B

सिद्धार्थ लालच राहणार एमडीपदी

Patil_p

भारताचा जीडीपी 7.5 टक्क्यांवर राहण्याचे युएनचे संकेत

Patil_p

तेजीचा कल कायम

Omkar B
error: Content is protected !!