तरुण भारत

मंदिरात नमाज पठण केल्याने वाद

मथुरेतील नंदबाबा मंदिरात दोन जणांचे कृत्य

मथुरा

Advertisements

 उत्तरप्रदेशातील मथुरा येथील नंदगावचे प्रसिद्ध नंदबाबा मंदिरात नमाज पठणाचे प्रकरण समोर आले आहे. याची छायाचित्रे प्रसारित झाल्यावर मंदिर प्रशासनाने 4 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. मंदिराला गंगाजलाने स्वच्छ करण्यात आले आहे. नमाज पठण करण्याची घटना 29 ऑक्टोबर रोजीची असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना महामारीमुळे मंदिरात भाविकांची संख्या कमी होती. मंदिरात नमाज पठण करणारे दिल्लीतील खुदाई खिदमतगार संस्थेचे सदस्य असल्याचे पोलिसांच्या प्रारंभिक चौकशीतून समोर आले आहे. मंदिरात चार युवक पोहोचले होते. त्यांनी स्वतःची नावे फैजल खान, मोहम्मद चांद, नीलेश गुप्त आणि आलोक असल्याचे सांगितले होते. या युवकांनी स्वतःला हिंदू-मुस्लीम संस्कृतीवर आस्था ठेवणारे असल्याचे संबोधिले होते. मोबाईलमध्ये अनेक संत-महंतांसोबतची स्वतःची छायाचित्रेही दाखविली होती. मंदिराचे सेवादार कान्हा गोस्वामी यांच्याकडून दर्शनाची अनुमती त्यांनी मिळविली होती. फैजल आणि चांद मोहम्मद नमाज पठण करत असताना त्यांचे साथीदार नीलेश गुप्ता आणि आलोक यांनी छायाचित्रे काढली होती. मंदिरात नमाज पठण करण्यात आल्याने साधू-संतांमध्ये संताप पसरला आहे. सेवादार कान्हा गोस्वामी यांनी बरसाना येथील पोलीस स्थानकात धार्मिक भावना दुखावण्यात आल्याचा आरोप करत गुन्हा नोंदविला आहे.

Related Stories

उत्तरप्रदेशच्या 600 गावांमध्ये पूरसंकट, लोकांचे हाल

Amit Kulkarni

हरियाणात कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 19,369

Rohan_P

आयएस संशयित दाम्पत्याला दिल्लीत अटक

tarunbharat

कोरोनाचा नवा अवतार भारतात अद्याप नाही

Patil_p

पीएम मोदींच्या ‘मन की बात’वर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले…

Abhijeet Shinde

”मोदी सरकारकडून अर्थव्यवस्थेचे वाटोळे”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!