तरुण भारत

लोकमान्य सोसायटीच्या वास्को शाखेचा वर्धापनदिन साजरा

प्रतिनिधी/ वास्को

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेडच्या वास्को शाखेचा सोमवारी अठरावा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त वास्को शाखेत श्री सत्यनारायण महापुजा व ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला.  मेळाव्याला ग्राहकांचा व मान्यवरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

देवदर्शन व ग्राहक मेळाव्याचा हा कार्यक्रम सकाळी 11 वा. पासून सुरू झाला. संध्याकाळपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व संस्थेच्या ग्राहक व हितचिंतकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यात नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत, नगरसेवक दाजी साळकर, यतीन कामुर्लेकर, वंदना सातार्डेकर, मुरारी बांदेकर, धनपाल स्वामी, राजन फळदेसाई, गौरीश म्हार्दोळकर यांच्यासह अनेक उद्योजक व समाजेवकांचा समावेश होता.

यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या संचालिका सई ठाकुर बिजलानी यांच्यासह सोसायटीचे उत्तर गोवा विभागीय व्यवस्थापक कुमार प्रियोळकर, सहाय्यक व्यवस्थापक अँथनी आझावेदो, व्यवस्थापक सी. जी. पै, एच आर मॅनेजर गायत्री नाईक, सोसायटीचे दक्षिण गोवा विभागीय व्यवस्थापक सुहास खांडेपारकर, उप सरव्यवस्थापक गोविंद धुरी, मार्केटींग व्यवस्थापक ई. मान्युएल फुर्तादो, दक्षिण गोवा क्लस्टर प्रमुख सावियो डिमेलो, वास्को शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक वासू आमोणकर, बायणा शाखेच्या व्यवस्थापक स्वाती वायंगणकर, नवेवाडे शाखेच्या व्यवस्थापक मनीषा साळगांवकर, सडा शाखेच्या व्यवस्थापक प्रीतम पेडणेकर, दाबोळीचे व्यवस्थापक सुदन रेडकर व संस्थेच्या कर्मचाऱयांनी पाहुण्यांचे स्वागत व आदरातीथ्य केले. मान्यवर पाहुण्यांनी व संस्थेच्या ग्राहक तसेच हितचिंतकांनी संचालीका सई ठाकूर बिजलानी तसेच संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱयांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. संध्याकाळी उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालला.

श्री सत्यनारायण महापुजेचे यजमानपद वास्को शाखेचे व्यवस्थापक श्री. वासु आमोणकर व सौ. वैशाली आमोणकर यांनी भुषविले.

Related Stories

कोरोनाचा एकही मृत्यू नाही, 198 नवे रुग्ण

Patil_p

गोव्यातील प्रवासी बस वाहतुकीच्या प्रश्नावर तोडग्यासाठी पुन्हा प्रयत्न होणार, बस मालक संघटनेने घेतली वाहतुकमंत्र्यांची भेट

Omkar B

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांकडून पत्रादेवी चेक नाक्मयाची पाहणी

Omkar B

लॉकडाऊन उठेपर्यंत मासेमारी बंद

Patil_p

कोरोनामुक्त गोव्याला शेजारील राज्यांचा धोका कर्नाटक, महाराष्ट्रात वाढते रुग्ण

tarunbharat

कोरोनामुळे आणखीन चौघांचा मृत्यू

Omkar B
error: Content is protected !!