तरुण भारत

गेट द फ्युजन लूक

सणावारी, लग्नसराईला पारंपरिक पेहराव करण्यावर भर दिला जातो. सध्या एथनिक्सला वेस्टर्न शैलीची जोड देऊन फ्युजन करण्याची फॅशन आहे. अशा फ्युजनमुळे तुम्हाला हटके लूक मिळतो. तुम्हीही पारंपरिक कपडय़ांना फ्युजनच्या माध्यमातून हटके लूक देऊ शकता. तसंच एकच पेहराव वेगवेगळ्या पद्धतीने कॅरी करू शकता.

* विशेष प्रसंगी शरारा घालायचा असेल तर झगमगीत किंवा वर्कवाला ड्रेस घ्या. बाजारात विविध रंगांचे शरारा मिळतात. पण सण, समारंभासाठी लाल, केशरी, गुलाबी, मोरपिशी अशा गडद रंगांची निवड करा. फ्युजनसाठी शराराच्या बॉटमला वेस्टर्न ट्विस्ट देता येईल. तसंच कुर्ताही हटके पद्धतीने कॅरी करता येईल. शराराचा स्टोल किंवा दुप्पट्टाही वेगळ्या पद्धतीने ड्रेप करता येईल.

Advertisements

* अनारकली हा सदाबहार पॅटर्न आहे. अनारकलीमध्येही बरेच प्रकार पहायला मिळतात. अगदी सिल्कपासून वेलवेटपर्यंत वेगवेगळ्या मटेरियलचे अनारकली मिळतात. तुम्ही छानसा अनारकली विकत घेऊ शकता.  ट्रेंडी अनारकली घालून तुम्ही वेगळा लूक मिळवू शकता.

* महागडे कपडे फार घालता येत नाहीत. त्यामुळे तुम्ही ट्रेंडी पण दररोज वापरता येण्यासारखे कपडे विकत घ्या. यामुळे तुमचे पैसे वाया जाणार नाहीत.

* थोडे सैलसर कुर्ते छान दिसतात. हे कुर्ते दिवसा आणि रात्रीही शोभून दिसतात. हे कुर्ते दिवसा चुडीदारसह आणि रात्री पलाझो किंवा ट्रेंडी बॉटमसोबत घालता येतील.

* धोती पँट हा प्रकारही इन आहे. धोती पँट दैनंदिन वापरासाठीही उपयुक्त आहे. त्यावर कफ्तानसारखे दिसणारे लाँग कुर्ते घेता येतील.

* पलाझो आणि लॉंग कुर्ता ही स्टाईलही छान दिसते.        * लाँग कुर्ता आणि स्कर्ट ही स्टाईलही खूप छान दिसते. इंडो-वेस्टर्न स्टाईल वन पीसही चालून जातील. एखादा स्लिट कुर्ता पलाझो किंवा चुडीदारवर कॅरी करता येईल.

Related Stories

त्वचेला तजेला देणारे नैसर्गिक क्लिंजर्स

Omkar B

तरुण तजेलदार त्वचेसाठी

Amit Kulkarni

अंटार्क्टिकावरचं मराठी पाऊल

Omkar B

लक्षणं आथ्रयिटिसची

Omkar B

मैत्रीलाही हवी मर्यादा

Omkar B

आहार पावसाळ्यातला

Omkar B
error: Content is protected !!