तरुण भारत

महिला पोलीस अधिकाऱयास ट्रव्हल मालकाची धक्काबुक्की

उंडाळेच्या आठवडी बाजारातील घटना; वाहतूक सुरळीत करताना प्रकार

प्रतिनिधी/ कराड

Advertisements

उंडाळे (ता. कराड) येथील आठवडी बाजारात वाहतूक सुरळीत करत असताना ट्रव्हल्स मालकास पोलिसांनी हटकले. यावरून संतापलेल्या ट्रव्हल्स मालकाने धमकीची भाषा वापरत साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील यांना धक्काबुक्की करत ढकलून दिले. तुमची लायकी काय आहे, विश्वास नांगरे-पाटीलसुद्धा माझी गाडी अडवत नाहीत, अशी भाषा वापरत ट्रव्हल्स मालकाने  तेथून पलायन केले. महिला पोलीस अधिकाऱयास झालेल्या धक्काबुक्कीने पोलीस दलात खळबळ उडाली.

 याप्रकरणी सहाय्यक निरीक्षक दीपज्योती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रव्हल्स मालकावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विजय चिंचोळकर (रा. रांजणवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रव्हल्स चालकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दीपज्योती पाटील या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात एक वर्षापासून कर्तव्य बजावत आहेत. सध्या त्या उंडाळे दूरक्षेत्र या ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून काम करीत आहेत.

रविवार 1 नोव्हेंबर रोजी उंडाळे गावचा आठवडा बाजार होता. बाजारात महिला पोलीस अधिकारी दीपज्योती पाटील या हवालदार .खराडे, हवालदार चव्हाण यांच्यासह कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लोकांना सूचना देत गस्त घालत होत्या. दुपारी धनाजी चव्हाण (रा. विठ्ठलवाडी, ता. कराड), सुरज पाटील (रा. येळगाव), प्रताप आबासाहेब भणगे (रा. विठ्ठलवाडी), अमोल सुतार (रा. येणपे) हे पोलिसामकडे आले. त्यांनी रस्त्यावर वाहने कशाही उभी असल्याचे सांगितले. यातच सध्या ऊस वाहतूक सुरु असल्यामुळे ऊस भरुन येणाऱया ट्रक्टरमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचेही त्यांनी सांगत याकडे लक्ष द्या, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत असताना अडथळा ठरणाऱया वाहनधारकांना सुचना द्यायला सुरूवात केली. त्याच परिसरात उभ्या असलेल्या साजिरी ट्रव्हलसच्या मालकांना बोलावून त्यांना विचारणा केली. विचारणा केल्यानंतर   ट्रव्हल्स मालकाने अरेरावीची भाषा वापरायला सुरूवात केली. त्याचे नाव विचारल्यावर विजय चिंचोळकर असे सांगून तो सांगली जिह्यातील रांजणवाडी शिराळा येथील असल्याचे सांगितले. त्यांच्या रस्त्यावर थांबत असलेल्या ट्रव्हलमुळे वाहतुकीस होणाऱया अडथळ्या सूचना दिली. 

त्यावेळी त्याने पोलिसांकडे हातवारे करुन ‘तुमची काय लायकी

आहे ते मला माहीत आहे. तुम्ही कशासाठी करता हे देखील मला माहीत आहे’ अशी भाषा वापरली.

दीपज्योती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ट्रव्हल्स मालकाने त्यांना धमकीची भाषा वापरताना या रस्त्यावर माझ्या 50 गाडय़ा फिरतात. माझ्या गाडय़ांना विश्वास नांगरे पाटील असो किंवा कुठलाही आर. टी. ओ. असो ते सुद्धा हात करत नाहीत. कोणाची माझ्या गाडय़ांना हात करायची हिम्मत होत नाही असे तो बोलत होता. साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील यांनी त्यांना समजावून सांगत ‘तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. तुमच्या गाडय़ा कोणीही जाणीवपूर्वक थांबवत नसून आज आठवडा बाजार असून तुम्ही स्वत:च रस्त्यावरील वाहतुकीची परिस्थीती बघा’ असे सांगितले. 

ट्रव्हल्स चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने पाटील यांच्याकडे पाहात ‘तू स्वत:ला काय समजतेस, तुला वर्दीची जास्त घमेंडी आहे का? अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने दीपज्योती पाटील यांना  जोराने ढकलून देत धक्काबुक्की केली. इतर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच तो पोलिसांना धक्काबुक्की करून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. साहाय्यक निरीक्षक दीपज्योती पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून ट्रव्हल्स मालकावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड करत आहेत.

Related Stories

डांभेवाडी येथे मतदारांवर दबाव टाकणाऱ्या पाचजणांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

प्रतापगड कारखाना सुरू न झाल्यास टाळे तोडू

datta jadhav

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4,654 नवे रुग्ण ; 170 मृत्यू

Rohan_P

विनोद राय यांनी मागितली बिनशर्त माफी

Abhijeet Shinde

रामदास आठवलेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Abhijeet Shinde

एकाच कुटुंबातील तिघांना कारने चिरडले

Amit Kulkarni
error: Content is protected !!