तरुण भारत

फ्रान्सचा मालीमध्ये एअर स्ट्राईक; 50 दहशतवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / पॅरिस : 

फ्रान्स एअर फोर्सने मालीमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अल-कायदाशी संबंधित 50 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरन्स पार्ली यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

Advertisements

पार्ली म्हणाले, मालीच्या सीमा भागात दहशतवाद्यांच्या दुचाकींचा मोठा ताफा ड्रोन विमानाच्या नजरेत आला. त्यानंतर फ्रेंच हवाई दलाने मिसाईल हल्ला करण्यासाठी दोन मिराज आणि एक ड्रोन विमान पाठवले. या लढाऊ विमानांनी केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 50 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. 

एअर स्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या 30 दुचाकी नष्ट करण्यात आल्या. तसेच घटनास्थळावरून आत्मघातकी हल्ल्यासाठी वापरले जाणारे स्फोटकांचे पट्टे जप्त करण्यात आले आहेत. 

Related Stories

सैन्याचे काम देशाचे रक्षण, व्यवसाय नव्हे

Patil_p

युटय़ूब व्हिडिओज पाहून घरात विमानाची निर्मिती

Patil_p

नेपाळमध्ये ओली सरकार कोसळले

Patil_p

भारतीय लसीचा फॉर्म्युला चोरण्याचा चीनचा प्रयत्न

datta jadhav

जपानमध्ये लसप्रयोग

Patil_p

तबलिगींकडून पाकिस्तानातही कोरोनाचा फैलाव

prashant_c
error: Content is protected !!