तरुण भारत

सोलापूर शहरात ४२ नवे कोरोना रूग्ण, तिघांचा मृत्यू

मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती
बरे झाल्याने ३२ रुग्णांना सोडले घरी

तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

Advertisements

सोलापूर शहारात मंगळवारी नव्याने ४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर उपचार घेऊन बरे झाल्याने ३२ जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी दिली.

सोलापूर शहरात मंगळवारी १४५२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १४१० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ४२ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये २७ पुरुष तर १५ स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९६७४ झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : ९९३१६
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : ९६७४
-प्राप्त तपासणी अहवाल : ९९३६१
-प्रलंबित तपासणी अहवाल : ००
-निगेटिव्ह अहवाल : ८९६८७
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : ५४०
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : ४२७
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : ८७०७

Related Stories

आणि लाखाचा ऐवज परत मिळताच ‘त्या’ महिलेच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

Abhijeet Shinde

पोलिसांसाठी प्रत्येक जिह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र

prashant_c

सोलापूर : साडेसात लाखांची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह २ अधिकारी जेरबंद

Abhijeet Shinde

सोलापुरात 10 नवे कोरोनाचे रुग्ण, कोरोना बाधितांची संख्या 145 वर

Abhijeet Shinde

राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीसपदी संकेत शिंदे

prashant_c

सोलापूर : दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन चरणुकाका पाटील यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!