तरुण भारत

विनामास्क फिरणाऱयांकडून दंड वसुली सुरूच

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना विषाणुचा प्रसार वाढल्याने मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण सध्या विषाणुची लागन झालेल्या रूग्णांची संख्या कमी झाल्याने नागरीक  विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र महानगरपालिकेने विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहिम सुरूच ठेवली आहे. मंगळवारी विविध भागात ही कारवाई करून दंड वसुल करण्यात आले.

कोरोना विषाणुचा फैलाव झपाटय़ाने झाल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. दररोज शेकडो नागरिकांना कोरोना विषाणुची लागन झाल्याने सामाजिक अंतर राखणे आणि तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण शहरात काही नागरिक विनामास्क फिरत असल्याने दंडात्मक कारवाई करण्याची मोहिम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. मात्र दंडाची रक्कम अडीचशे रूपये करण्यात आल्याने नागरिक ही रक्कम भरण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्याने विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्याच्या मोहिमेत शिथीलता आली आहे.

महापालिकेच्या कारवाईत शिथीलता आल्याने विनामास्क फिरणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मंगळवारपासून महापालिकेने विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्याची मोहिम राबविली. शहराच्या विविध भागात ही मोहिम राबवून नागरिकांकडून दंड वसुल करण्यात आले. पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या वतीने विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्यात येत आहे. तरी देखील नागरिक विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे ही मोहिम तिव्रपणे राबविण्याचा विचार महापालिका प्रशासनाने चालविला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Stories

15 दिवस झाले तरी अद्याप चौकशी अपूर्णच

Amit Kulkarni

संकेश्वर शहर सीलडाऊन मुक्त

Patil_p

उद्यमबाग येथील एफएल एक्स्पर्ट येथे रोग प्रतिकार शक्तीवर्धक गोळय़ांचे वाटप

Patil_p

घर झाडण्यासाठी येवून मंगळसुत्र पळविणाऱ्या महिलेला अटक

Rohan_P

तलावात बुडून मुलाचा मृत्यू

Rohan_P

घर पडलेल्या कुटुंबीयांना-शेतकऱयांना तातडीने मदत करा

Patil_p
error: Content is protected !!