तरुण भारत

रत्नागिरी : साताऱ्यातील तरूणाचा महामार्गावर आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी / खेड
कर्जाच्या ओझ्यामुळे आलेल्या नैराश्यातून साताऱ्यातील तरुणाने हाताच्या नसा कापत महामार्गावर आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न काही जागरूक तरूणांनी पाठलाग करत मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हाणून पाडला. किशोर सुरेश बाबर असे तरूणाचे नाव असून कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
किशोर याच्यावर २ लाखाचे कर्ज आहे. लोटे येथून स्वीफ्ट कारने सातारा येथे जात असताना महामार्गावरील भरणे येथील सरस्वती पंपानजीक कार थांबवत हाताच्या नसा कापल्या. यानंतर भावाकडे संपर्क साधून नसा कापल्याचे सांगितले. भावाने तातडीने पुणे येथील प्रतिक मल्ला या मित्राकडे संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. मल्ला यांनी तातडीने ही बाब खेडमधील जागरूक तरुणांच्या कानावर घातली.
बुरहान टाके, रहिम सहीयोले, विवेक बनकर आदी तरूणांनी त्याचा थरार पाठलाग करत खवटी येथे पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. उपचारार्थ तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते.

Related Stories

चिपळुणात पावसाला दमदार सुरूवात!

Patil_p

अतिदुर्मीळ श्रेणीतील हंपबॅक व्हेलचे पुनरुज्जीवन

NIKHIL_N

सावित्रीच्या हजारो लेकींशी ‘बांधिलकी’

Abhijeet Shinde

पत्रकारांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

NIKHIL_N

तिलारी येथील अलगीकरण कक्षाची दुरवस्था

NIKHIL_N

मुंबई विद्यापीठ उपकेंद्राला धनंजय कीर यांच्या नावाचा प्रस्ताव

Patil_p
error: Content is protected !!