तरुण भारत

मुकेश अंबानींच्या संपत्तीत मोठी घसरण

श्रीमंताच्या यादीत आता नवव्या स्थानावर : तिमाही अहवालाचाही परिणाम

वृत्तसंस्था/ मुंबई 

Advertisements

समभागात मोठी घसरण राहिल्याने रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण राहिल्याची नोंद केली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत जवळपास 50 हजार कोटी रुपयांची घसरण राहिली आहे. (6.8 अब्ज डॉलर) सदरच्या घसरणीमुळे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अंबानींचे स्थान  सहावरुन 9 व्या स्थानावर घसरले आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचा तिमाहीमधील नफा हा मागील वर्षातील नफा कमाईच्या तुलनेत जवळपास 15 टक्क्यांनी कमी राहिला आहे.

कंपनीचे समभाग उच्चांकावरुन घसरणीकडे 

शेअर बाजारात दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिजच्या समभागांच्या तेजी आणि घसरणीने मोठा प्रभाव गुंतवणूकदार व कंपनीच्या उलाढालीवर होत असल्याचे संकेत नेहमी असतात. यामध्ये कंपनीच्या समभागांनी सर्वोच्च स्तरावरुन गुंतवणूकदारांना 20 टक्क्यांचा तोटा दिला आहे. यामध्ये मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सने दोन दिवसात जवळपास 700 अंकांनी वाढ नोंदवली होती. परंतु याच दोन दिवसात कंपनीचे समभाग कोसळले होते. एक्सचेंजच्या आकडय़ानुसार सोमवारी समभाग 8.62 टक्क्यांनी नुकसानीत राहिले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी हे समभाग 10 रुपयांनी वधारुन 1,888 रुपयांवर खुले झाले होते. परंतु काही मिनिटातच हे समभाग 1,843 रुपयांवर पोहोचले होते.  

अपेक्षेपेक्षा नफा कमाईत घट

रिलायन्सचे समभाग घसरल्याने मुकेश अंबानी यांच्या संपत्तीला मोठा झटका बसल्याचे दिसून आले आहे. सदरची संपत्ती घसरुन एकूण निव्वळ मूल्य 71.5 अब्ज डॉलर्सच्या घरात राहिल्याची माहिती फोर्ब्स रियल टाइम बिलिनेअर निर्देशांकाने दिली आहे. 

Related Stories

‘ऍपल’ कडून कारचे उत्पादन: 2024 पर्यंतचे ध्येय निश्चित

Patil_p

स्पाइसजेटची नवीन 21 उड्डाणे लवकरच

Patil_p

शेअर बाजार सलग दुस-या दिवशी घसरणीत

Patil_p

सात दिवसांत येस बँकेचे समभाग हजार टक्क्यांहून अधिक तेजीत

tarunbharat

युवा उद्योजक कंपनीत टाटाची गुंतवणूक

Patil_p

ऍपलची 22 जूनपासून वर्ल्डवाइड डेव्हलपर्स परिषद

Patil_p
error: Content is protected !!