तरुण भारत

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उद्या जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 नोव्हेंबर, 2020 रोजी जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद (व्हीजीआयआर) होणार आहे. या परिषदेचे आयोजन भारत सरकारच्या अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisements

जागतिक स्तरावरचे आघाडीचे संस्थात्मक गुंतवणूकदार , भारतातले मोठे व्यावसायिक आणि भारत सरकारमध्ये असलेले निर्णय घेणारे सर्वोच्च अधिकारी मंडळी आणि वित्तीय बाजार नियामक यांच्यामध्ये या गोलमेज परिषदेमध्ये विशेष संवाद साधला जाणार आहे. या परिषदेला केंद्रीय अर्थ मंत्री आणि अर्थ राज्यमंत्री, रिझर्व्ह बँकेचे गर्व्‍हनर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या गोलमेज परिषदेत जगामध्ये सर्वात वरच्या स्थानावर असलेले वीस ‘पेन्शन’ आणि ‘वेल्थ फंड’चे संबंधित प्रतिनिधी सहभागी होतील. या फंडांच्यामार्फत जवळपास 6 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सच्या मालमत्तेचे व्यवस्थापन केले जाते. या जागतिक ‘फंड’ संस्थांचे कार्य आणि  गुंतवणूकदार अमेरिका, युरोप, कॅनडा, कोरिया, जपान, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहेत.

या गोलमेज परिषदेमध्ये अव्वल फंड, गुंतवणूक आणि व्यवस्थापनाविषयी निर्णय घेणारे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी सहभागी होणार आहेत. यापैकी काही गुंतवणूकदार पहिल्यांदाच भारत सरकारच्यावतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. जागतिक गुंतवणूकदारांव्यतिरिक्त या आभासी गोलमेज परिषदेमध्ये भारतामधील प्रमुख व्यावसायिक, उद्योजकही सहभागी होणार आहेत.

Related Stories

जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतो तालिबान इफेक्ट

Patil_p

जम्मू-काश्मीर : प्रायोगिक तत्वावर 4 जी सेवा सुरू होणार

Patil_p

जालंधरचे माजी बिशप फ्रँको मुलक्कल निर्दोष

Patil_p

बिहारमध्ये 1,609 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

जम्मू-काश्मीर : पुंछमध्ये सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक

datta jadhav

कोरोना लससंबंधी ‘गुड न्यूज’

Patil_p
error: Content is protected !!