तरुण भारत

विवो व्ही 20 एसई स्मार्टफोन बाजारात

नवी दिल्ली

 विवोने भारतात विवो व्ही 20 एसई हा नवा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. या फोनची किंमत 20 हजार 990 रुपये इतकी असणार असल्याचे समजते. या नव्या स्मार्टफोनची विक्री 3 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून इ स्टोअरशिवाय महत्त्वाच्या इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या फोनला स्नॅपड्रगन 665 चिपसेट असून 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजची सोय आहे. 6.44 इंचाचा इमोलेड डिस्प्ले, वॉटरड्रॉप नॉच तसेच 32 एमपीचा कॅमेरा ही वैशिष्टय़े या फोनमध्ये आहेत. सुपर नाइट सेल्फी, ऑरा स्क्रीन लाइट आणि इतर वैशिष्टय़ेही यात समाविष्ट असतील. 4 हजार 100 एमएएचची बॅटरी याला आहे.

Related Stories

ऍपल आयफोन 12 ची किंमत

Patil_p

शाओमी फोल्डेबलची गॅलेक्सीशी टक्कर

Patil_p

डिजिटल वाटचालीसाठी फेसबुक-सॅमसंग एकत्र

Patil_p

स्वदेशी जिओ मिटद्वारे 100 जणांना एकत्रित बैठकीची सोय

Patil_p

स्मार्टफोन्समध्ये जिओमार्टचे स्थान मजबूत

Patil_p

भारती एअरटेलकडून अवादात 5 टक्के वाटा खरेदी

omkar B
error: Content is protected !!