तरुण भारत

कर्नाटक पोटनिवडणूक: सीरा येथे ८२ टक्के तर आर.आर.नगरसाठी ४५ टक्के मतदान

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक बेंगळूरमधील राजराजेश्वरी नगर (आरआर नगर) आणि तुमकूर जिल्ह्यातील सीरा या दोन विधानसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. दोन्ही मतदार संघात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

सीरा मतदारसंघासाठी एकूण ८२.३१ टक्के मतदान झाले, तर राजराजेश्वरी नगर मतदार संघात केवळ ४५.२४ टक्के मतदान झाले. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत आरआर नगरमध्ये ५४ टक्के आणि सीरा येथे ८४.३१ टक्के मतदान झाले होते. दरम्यान २०१८ च्या तुलनेत दोन्ही मतदार संघात मतदानाची टक्केवारी घटलेली आहे.

आरआरनगरला १४८ पॉझिटिव्ह रुग्णांनी पीपीई किट वापरून मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. तर सिरा मतदार संघातील निवडणुकीसाठी ३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी खबरदारी घेत मतदान केले. दरम्यान १० नोव्हेंबरला पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

Advertisements

Related Stories

मी अश्लील काही पहात नव्हतो : एमएलसी राठोड

triratna

केंद्रीयमंत्री सदानंदगौडा यांनी घेतला लसीचा दुसरा डोस

Amit Kulkarni

निजद-काँग्रेस युतीचे सरकार पाडण्यासाठी ‘पेगासस’चा वापर?

Amit Kulkarni

बेंगळूर : पोलिसांकडून तीन गांजा विक्रेत्यांना अटक

triratna

“कर्नाटकात अ‍ॅम्फोटेरिसिन-बी औषधाची कमतरता”

triratna

कर्नाटक: डॉक्टरांनी संप मागे घ्यावा : मंत्री सुधाकर

triratna
error: Content is protected !!