तरुण भारत

दहशतवादी हल्ल्याने व्हिएन्ना हादरले

मुंबई हल्ल्याच्या धर्तीवर एकाचवेळी सहा स्फोट : 5 जणांचा मृत्यू, एक दहशतवादीही ठार : हल्ल्याचा निषेध

वृत्तसंस्था / व्हिएन्ना

Advertisements

फ्रान्समध्ये इस्लामी दहशतवाद्यांकडून शिक्षकाच्या शिरच्छेदाचे प्रकरण जगभर गाजत असतानाच ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे जवळपास एकाच वेळी सहा स्थानांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून एका दहशतवाद्यालाही कंठस्नान घालण्यात आले. मंगळवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार  साधारण मध्यरात्री 2 वाजता ही घटना घडली. हल्ल्यानंतर त्वरित या विभागांची नाकेबंदी करण्यात आली.

एकंदर सहा दहशतवाद्यांनी या हल्ल्यांचे कटकारस्थान प्रत्यक्षात उतरविले. बुधवारपासून ऑस्ट्रियात लॉकडाऊनचा प्रारंभ होणार आहे. त्याआधीच हे हल्ले करण्यात आले. 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबई शहरावर हल्ला केला होता. तशाच प्रकारचा हा हल्ला आहे. त्यात 100 हून अधिक नागरिक जखमी झाले. त्यापैकी 20 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा हल्ला इस्लामिक स्टेट या जहाल आणि हिंसाचारी इस्लामी संघटनेशी संबंध असणाऱयांनी केल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रियात या संघटनेची पाळेमुळे घट्ट झाली आहेत. संघटनेचे दहशतवादी युरोपियन संस्कृतीला इस्लामचा शत्रू मानतात, असे या संघटनेच्या अनेक हस्तकांनी म्हटले आहे.

जगभरात तीव्र प्रतिक्रिया

या दहशतवादी हल्ल्याचे जगभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या घटनेचा निषेध केला असून

दहशतवाद्यांचा नायनाट करण्याच्या विश्वसमुदायाने एकत्रितरित्या काम करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केले असून ऑस्ट्रियाच्या पाठीशी भारत उभाअसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इतरही अनेक देशांच्या प्रमुखांनी अशाच प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इस्लामी दहशतवाद हा साऱया जगावरचे सामायिक संकट आहे. त्याचा निपटारा एकत्रितपणे केला पाहिजे, असे जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मर्केल यांनी म्हटले आहे.

अंदाधुंद गोळीबार

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या या दहशतवाद्यांनी हल्ला करताना निरपराध लोकांवर निर्घृणपणे गोळीबार केला. दिसेल त्याला गोळी घालणे याच उद्देशाने त्यांनी हा हिंसाचार घडविला, असे स्थानिक पोलीसांनी स्पष्ट केले. दहशतवाद्यांनी ऑस्ट्रियाचे मंत्री  राबी स्कोलोमो यांच्या बंगल्याच्या नजीकही गोळीबार केल्याचे  स्कोलोमो यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.

फ्रान्स कनेक्शन ?

व्हिएन्नातील या हल्ल्याचा संबंध फ्रान्समधील दशहतवादी संघटनांशी असल्याचे दिसून येत आहे. फ्रान्समध्ये सध्या मोहम्मद पैगंबरांच्या व्यंगचित्राचा वाद भडकला आहे. तेथील मुस्लीम दहशतवाद्यांनी भीषण दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. त्याचीच हा ऑस्ट्रियातील परिणाम आहे. यापुढच्या काळात युरोपात पुन्हा दहशतवादी हल्ले वाढू शकतात, असे तज्ञांनी म्हटले आहे.

1 मिनिटात 100 गोळय़ा

दहशतवाद्यांनी 1 मिनिटात 100 गोळय़ा अशा गतीने हा गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. यावरून त्याची भीषणता स्पष्ट होते. दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाल्यानंतर नागरिकांनी पळापळ केली. त्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकले.  

धडा शिकविला जाईल

ऑस्ट्रियासारख्या शांतताप्रिय देशाला इस्लामी दहशवाद्यांनी लक्ष्य केले आहे. अत्यंत भीषण हल्ला त्यांनी आमच्या देशात केला आहे. याची पुरेपूर किंमत दहशतवाद्यांना भोगावी लागेल, असा इशारा या देशाचे चान्सेलर सॅबेsिस्टयन कुर्झ यांनी दिला आहे. या हल्ल्याच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. पोलिसांनी स्थानिक मशिदींवर धाडसत्र सुरू केल्याचे वृत्त आहे.

Related Stories

नेपाळच्या नवीन नकाशाला विरोध करणाऱ्या महिला खासदाराची पक्षातून हकालपट्टी

datta jadhav

चीनमधून कोरोना महामारीची सुरुवात : डब्ल्यूएचओ

Patil_p

स्थिती नियंत्रणात, चीनचा दावा

Patil_p

चीनमध्ये 3 कोटी पुरुष अविवाहित

Patil_p

फ्रान्समध्ये तिसरी लाट

datta jadhav

ब्राझीलमध्ये 8.5 लाखाहून अधिक कोरोनाबाधित

datta jadhav
error: Content is protected !!