तरुण भारत

आपत्तीनंतरही 4 वर्षीय आयदा सुखरुप

इस्तंबूल

 तुर्कस्तानात भूकंपाच्या 91 तासांनी 4 वर्षीय मुलीला इमारतीच्या ढिगाऱयाखालून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. ही इमारत भूकंपाने सर्वाधिक प्रभावित इजमिर शहरातील होती. 91 तासांनी आम्ही एक चमत्कार होताना पाहिला आहे. बचावपथकाने 4 वर्षीय आयदाला वाचविले आहे. आम्ही अत्यंत दुःखात आहोत, तरीही आमच्यासोबत हा आनंदाचा क्षण आला असल्याचे उद्गार इजमिर शहराचे महापौर टय़ून्क सोयेर यांनी काढले आहेत.

Advertisements

वाचविण्यात आलेल्या मुलीचे नाव आयदा आहे. तुर्कस्तानात हे प्रचलित नाव आहे. चंद्रावरून उतरलेली असा याचा अर्थ होतो. आयदाला थर्मल ब्लँकेटमध्ये गुंडाळून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बचावपथकाला पाहून मुलीने हात हलविले होते. आम्ही एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर तिला शोधण्यात आले असता ती एका डिशवॉशरनजीक दिसून आली. आम्हाला पाहिल्यावर तिने हात हलविला. ती आता ठीक असल्याचे बचावपथकाच्या सदस्य नुसरत अक्सोय यांनी म्हटले आहे.

मृतांचा आकडा 100 पार

तुर्कस्तानात 30 ऑक्टोबर रोजी तीव्र भूकंपाचा धक्का बसला होता. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 7 इतकी होती. तेथील मृतांचा आकडा 102 झाला आहे. र 994 जण जखमी झाले आहेत. इजमिरमध्ये अद्याप बचावकार्य सुरू आहे. तेथे बेपत्ता झालेल्या लोकांची संख्याही अद्याप समोर आलेली नाही. तुर्कस्तानात 3500 तंबू उभारण्यात आले असून 13 हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेद्वारे बेघराना मदत पुरविली जाणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले आहे.

Related Stories

अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणारा मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलला परतला

triratna

सैन्यविमानांचा लस वितरणासाठी वापर

Patil_p

नेपाळच्या रेडिओवर भारतविरोधी भाषणे अन् गाणी

datta jadhav

भारताकडून इम्रान खान यांचा फोन हॅक

datta jadhav

अमेरिका अन् ऑस्ट्रेलियाविरोधात फ्रान्सचे पाऊल

Patil_p

ब्रिटनमध्ये श्वान पटविणार बाधितांची ओळख

Patil_p
error: Content is protected !!