तरुण भारत

बिहारला दुसऱया टप्प्यात 53.51 टक्के मतदान

पाटणा

 बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यासाठी मंगळवारी मतदान पार पडले आहे. या मतदानामुळे 94 मतदारसंघांमधील साधारणतः 1 हजार 500 उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद झाले. या उमेदवारांमध्ये राजदचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचाही समावेश आहे. एकंदर 53.51 टक्के मतदान झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली. ही टक्केवारी 2015 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा 3 टक्क्यांनी कमी आहे. सकाळी 7 वाजता मतदानास प्रारंभ झाला. प्रारंभी मतदानाचा वेग कमी होता. साधारणतः 11 नंतर तो काही प्रमाणात वाढला. काही स्थानी मतदानयंत्रातील समस्यांमुळे काहीकाळ मतदान खंडित झाले होते. तथापि, त्वरित नवी यंत्रे  देण्यात आली. दोन ठिकाणी हिंसाचार व दगडफेकीच्या घटना घडल्याचे सांगण्यात आले.

Advertisements

Related Stories

दिल्लीतील कोरोना : दिवसभरात 228 नवे रुग्ण; 12 मृत्यू

Rohan_P

तेलंगणा : भूमिगत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये भीषण आग

datta jadhav

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 4 लाख देणे अशक्य

Patil_p

बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेला आम्ही विसरलो नाही : ओवैसी

prashant_c

केरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यु

Patil_p

हेमंत शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री

Patil_p
error: Content is protected !!