तरुण भारत

वाळपई नगरपालिका मंडळाच्या कारभारावर समाधान

उदय सावंत /वाळपई

 वाळपई नगरपालिकेची निवडणूक 4 नोव्हेंबर 2015 रोजी संपन्न झाली होती. 4 नोव्हेंबर 2020 रोजी नगरपालिकेची मुदत संपत आहे. सरकारने अजून पर्यंत नगरपालिकांना वाढीव मुदत न दिल्यामुळे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सर्व नगरसेवकांना घरचा रस्ता धरावा लागणार आहे .नवीन निवडणुकीची तारीख अजूनही जाहीर झालेली नाही. यामुळे नगरपालिकेवर प्रशासक नियुक्तीचे आदेश येण्याची शक्मयता आहे. गेल्या पाच वर्षात वाळपई नगरपालिका मंडळाने कशाप्रकारे कारभार हाताळला यासंदर्भाचा सविस्तरपणे आलेख घेणारी ही बातमी आहे.

Advertisements

 तसे पहावयास गेलो तर गेल्या पाच वर्षात वाळपई नगरपालिका मंडळाने नेत्रदीपक अशी कामगिरी केलेले दिसत नाही. मात्र नगरपालिका क्षेत्रातील कुणाही नागरिकाला कोणत्याही कामानिमित्त अडवून न ठेवता समाधानकारक काम केल्याचे कार्य सुद्धा नाकारता येण्यासारखी नाही. वाळपई नगरपालिका निवडणूक 4 नोव्हेंबर 2015 साली संपन्न झाली होती. वाळपई नगरपालिकेचे एकूण दहा वार्ड आहेत .या दहा वाँ?र्डापैकी आठ नगरसेवक हे ा?ग्रेस पक्षाचे अर्थातच विश्?वजित राणे यांचे समर्थन निवडून आले होते. दोन वार्डा मध्ये भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. यावेळी विश्वजित राणे काँग्रेस पक्षाचे आमदार होते .यामुळे आठ नगरसेवक व त्यांचे समर्थक बनले होते. यामुळे अर्थातच पाच वर्षाच्या सत्ता वाटपाचा अधिकार या आठ नगरसेवकांना प्राप्त झाला होता.

पाच वर्षात तीन नगराध्यक्ष.

नगरपालिकेची निवडणूक संपन्न झाल्यानंतर नगराध्यक्षपदी पहिल्यांदा बसण्याचा मान वार्ड क्रमांक 2  नगरसेवक रामदास वाडकर यांना प्राप्त झाला. त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांनी जवळपास दीड वर्षाचा कार्यकाळ हाताळल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला व त्यांच्या जागी वार्ड क्रमांक 6 च्या नगरसेविका परविन शेख यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. पुन्हा एकदा त्याने दीड वर्षाचा कार्यकाल हाताळल्यानंतर राजीनामा दिल्याने उर्वरित दोन वर्षाचा कार्यकाळ सध्याचे विद्यमान  नगराध्यक्ष अख्तर शहा यांच्याकडे आला. त्यांच्याजवळ दोन वर्षाचा कार्यकाळ आज 4 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. यामुळे पाच वर्षात तीन नगराध्यक्षांनी वाळपई नगरपालिकेचा कार्यभाग हाताळला. यापाच वर्षांत तीन नगराध्यक्षांनी समाधानकारक कार्यकाळ हाताळल्याचे चित्र पहावयास मिळाले .दैनंदिन येणारी कामे हातावेगळी करून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची विशेष दखल या नगराध्यक्षांनी घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले.

तीन उपनगराध्यक्ष.

तीन नगराध्यक्षा प्रमाणेच वाळपई नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदावर तीन नगरसेवकांनी कार्य केले. पहिल्यांदा   उपनगराध्यक्ष म्हणून वार्ड क्रमांक 10 च्या नगरसेविका सेहझीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली होती. जवळपास दीड वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व त्यानंतर सरफराज सय्यद यांची उपनगराध्यक्पदी निवड झाली. त्यांनी पुन्हा दीड वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर या पदावर वार्ड क्रमांक 5 च्या नगरसेविका परविन खान यांची निवड झाली. त्यांचाही कार्यकाळ आता नगरपालिकेचे मुदत संपुष्टात आल्यानंतर संपलेला आहे. त्यामुळे पाच वर्षाच्या कारकिर्दीत तीन नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला.

तीन नगरसेवक मात्र कोणत्याही पदापासून वंचित.

 नगरपालिका मंडळाचे एकूण दहा नगरसेवक आहेत. यात अनिल काटकर रामदास शिरोडकर रसिकांत चारी अतुल दातये परवीन खान परवीन शेख सरफराज सय्यद अख्तर शहा  अंजली चारी व सेहझीन शेख यांचा खास करून समावेश आहे. निवडून आलेल्या दहा नगरसेवकांपैकी रशिकांत चारी व  अतुल दातये हे दोन भाजपाचे नगरसेवक होते . यामुळे सत्तास्थापनेच्या लाभापासून त्यांना अपेक्षेप्रमाणे दूर राहावे लागले. तर वार्ड क्रमांक 1 चे नगरसेवक अनिल काटकर यांना पाच वर्षासाठी स्थायी समितीचा सभासद होण्याची संधी प्राप्त झाल्यामुळे त्यांना नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष पदाचा लाभ झाला नाही. तर वार्ड क्रमांक 9 च्या नगरसेविका अंजली चारी यांनाही कोणत्या प्रकारचे पद प्राप्त झाले नाही. यामुळे विद्यमान नगरपालिका मंडळातील तीन नगरसेवक कोणत्याही पदाच्या लाभापासून दूरच राहिले.

प्रमुख समस्या मात्र कायम.

गेल्या पाच वर्षात नगरपालिका मंडळाने वेगवेगळय़ा विकास कामावर प्रामुख्याने भर दिल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र सामाजिक स्वरूपाची वाहतुकीचे समस्या सोडवण्यास पालिका मंडळाला अपयश आल्याचे निदर्शनास आलेली आहे. वाळपई शहराची पार्किंग समस्या ही दिवसेंदिवस डोकेदुखीची बनत चाललेली आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक वेळा द्यिमान आमदार विश्?वजित राणे यांनी या समस्या संदर्भात गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते. अनेकवेळा त्यांनी पालिका मंडळाला निर्देश दिले होते. मात्र ही समस्या सोडविण्यात पालिका मंडळाला अपयश आल्याच्या पहावयास मिळाले. महत्त्वाचे म्हणजे वाहतूक व पार्किंग व्यवस्थे संदर्भात नगरपालिकेने जवळपास दहा लाखांच्या आसपास खर्च केल्याचे निदर्शनास आलेली आहे. वेगवेगळय़ा ठिकाणी सूचना फलक लावून व्यवस्था करण्यासंदर्भात हा निधी खर्च केल्याचे निदर्शनास आले मात्र ही समस्या मात्र अजून पर्यंत सुटलेली नाही.

Related Stories

आचारसंहितेपुर्वीच दहा हजार नोकऱया

Omkar B

फोंडय़ातील आरोग्य सेवा व रस्त्यांसाठी आता आंदोलन

Omkar B

‘संकेतस्थळांकडे लक्ष देण्याचे काम मुख्यमंत्री, मुख्य सचिवांचे नव्हे’

Patil_p

केरी मार्गे होणारा भाजीपाला बंद करा

Patil_p

19 वर्षांखालील गोव्याच्या दोन्ही संघांच्या क्रिकेट लढती आजपासून

Amit Kulkarni

आपच्या उर्जामंत्र्यांनी कुडतरीतील महिला गट, शेतकऱयांची घेतली भेट

Amit Kulkarni
error: Content is protected !!