तरुण भारत

आयसीजीएस सी-452 बोटीचे रत्नागिरीत अनावरण

प्रतिनिधी/ रत्नागिरी

भारतीय तटरक्षक अवस्थान सी-452 ही 54 इंटरसेप्टर बोटींच्या मालिकेतील 52 व्या बोटीचे तटरक्षक कमांडर (समुद्री पश्चिम क्षेत्र) अवर महानिर्देशक राजन बड़गोत्रा, पीटीएम, टीएम यांच्याहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा मंगळवारी तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राचे कमांडर महानिरीक्षक ए. पी. बडोला यांच्या उपस्थितीत जयगड येथे अनावरण करण्यात आले.

Advertisements

तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सामील झाल्यानंतर आयसीजीएस सी-452 ही बोट जयगड, रत्नागिरी येथे तैनात राहिल. या बोटीच्या कमान अधिकारीपदाची जबाबदारी सहाय्यक कमांडंट अमोघ शुक्ला यांचेवर सोपवण्यात आली आहे. आयसीजीएस सी-452 हे भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या अधीन पाचवे जहाज असून या बनावटीचे हे तिसरे जहाज आहे. हे जहाज भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीची विविध कार्ये पार पाडण्याची क्षमता वाढवेल. हे जहाज तटरक्षक दलाला भारतीय जलक्षेत्रामध्ये घुसखोरी, तस्करी व अवैधरित्या बेकायदेशीर कामे रोखण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अत्याधुनिक नेव्हीगेशन व संदेश सेंसर्स प्रणालीने युक्त ही बोट उष्णकटिबंधीय वातावरणात कार्यरत रहण्याची क्षमता असणारी असून ताशी 45 नाविक मेल वेगाने समुद्रात संचार करू शकते. ही संपूर्णत: भारतीय बनावटीची बोट असून हिची निर्मिती लार्सन व टूब्रो शिपयार्ड मर्यादित या कंपनीद्वारे सुरत येथे करण्यात आली आहे. ही बोट 27 मीटर लांब असून यामुळे 105 टनचे विस्थापन होईल. या जहाजाची प्राथमिक भूमिका तस्करी प्रतिबंध, सागरी गस्त, शोध आणि बचाव यासारखी विविध कामे पार पाडणे, ही असेल. या जहाजासाठी एक अधिकारी व 14 नाविकांची तुकडी तैनात असेल. या जहाजात आयबीएस, ईसीडीआयएस व जीएमडीएसएस ही अत्याधुनिक उपकरणे आहेत. 12.7 एमएम हेवी मशीनगन हे या जहाजाचे मुख्य शस्त्र आहे.

Related Stories

दाणोली साटम महाराज पुण्यतिथी उत्सव साधेपणाने साजरा

NIKHIL_N

वकील असल्याची बतावणी करून सव्वा लाखाचा गंडा

Patil_p

मालवणच्या प्रवेशद्वारावर कसून तपासणी

NIKHIL_N

देवरुख आगाराला भाजपने धरले धारेवर

Patil_p

कोरोनाग्रस्तांच्या ‘लाईफ’साठी ‘सुप्रिया’चा हातभार!

Patil_p

जिल्ह्य़ातील 87 उपकेंद्रातही होणार कोरोना लसीकरण

Patil_p
error: Content is protected !!