तरुण भारत

दाऊदच्या मालमत्ता लिलावाची अर्ज प्रक्रिया 6नोव्हेंबरपर्यंत होणार पूर्ण

10 नोव्हेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लिलाव

प्रतिनिधी/ खेड

Advertisements

कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचे मुळगाव असलेल्या मुंबके येथील 6 मालमत्तांसह लोटेतील जागेच्या लिलावासाठी 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या लिलावासाठी बोलीधारकांकडून ठेवीही जमा केल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱयांसह बोलीधारकांनी मालमत्तेची पाहणी केली. 10 नोव्हेंबर रोजी तस्करी व विदेशी विनीमय हाताळणी कायद्यातंर्गत मालमत्तेचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लिलाव होणार आहे.

  दाऊद इब्राहिम याचा मुंबके येथे 2 मजली बंगल्यासह 6 जमिनी, आंबा कलमांची बाग व लोटे येथे एक फ्लॉट आहे. 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर चर्चेत आलेल्या दाऊदच्या बंगल्यासह अन्य मालमत्ता शासनाच्या ताब्यात होत्या. वर्षभरापूर्वीच दाऊदच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या सर्व मालमत्तांचे ऍन्टी स्मगलिंग एजन्सीकडून मूल्यांकन झाल्यानंतर त्यांचे मूल्यनिर्धारण करण्यात आले होते. त्यानुसार 30 गुंठे जमिनीवरील बंगल्याची राखीव किंमत 6 लाख 14 हजार 8100 रूपये, 29.30 गुंठे जमिनीची राखीव किंमत 2 लाख 23 हजार 300 रूपये, 27 गुंठे जमिनीची राखीव किंमत 2 लाख 5 हजार 800 रूपये, 24.90 गुंठे जमिनीची राखीव किंमत 1 लाख 89 हजार 800 रूपये, 20 गुंठे जमिनीची राखीव किंमत 1 लाख 52 हजार 500 रूपये, तर 18 गुंठे जमिनीची राखीव किंमत 1 लाख 38 हजार रूपये निश्चित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे येथील जिल्हा मूल्य निर्धारण अधिकाऱयांकडे मालमत्तांचे मूल्याकंन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  कोरोनाच्या संकटामुळे 10 नोव्हेंबर रोजी दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्याचे जाहीर झाल्यानंतर साऱयांच्या नजरा लिलाव प्रक्रियेकडे खिळल्या होत्या. त्यातच केंद्रीय वित्त मंत्रालयाचे अधिकारी यशवंत मोंडेकर व सहकाऱयांनी बोलीधारकांसह मुंबके व लोटे येथील दाऊदच्या मालमत्तांची पाहणी करत लिलाव प्रक्रियेवर शिक्कामार्तब केले आहे. बोलीधारकांसह झालेल्या मालमत्तांच्या पाहणीमुळे लिलावासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 6 नोव्हेंबरपर्यंत ठेवी जमा करण्यात येणार आहेत. यानंतर 10 नोव्हेंबर रोजी सर्व मालमत्तांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लिलाव होणार आहे. ही लिलाव प्रक्रिया नेमकी कशी पार पडते, याची उत्सुकता साऱयांना लागून राहिली आहे.

Related Stories

हरिश्चंद्र गडावर नव्या फुलवनस्पतीचा शोध

Shankar_P

रात्रीच्या निरव शांततेत ‘जीवघेणा लपंडाव’

NIKHIL_N

दुचाकी दरीत कोसळून तरूण जागीच ठार

Omkar B

महाविद्यालये पुन्हा गजबजणार

NIKHIL_N

कोरोनाबाधितांवर होणार आता गावातच अंत्यसंस्कार

Patil_p

जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर ‘लाचलुचपत’च्या सापळय़ात

tarunbharat
error: Content is protected !!