तरुण भारत

रियलमीचे स्मार्टवॉच-नॉइसचे एअर बड्स बाजारात दाखल

सवलतीच्या दरात भारतीयांना उपलब्ध होणार?

बीजिंग : चीनी कंपनी रियलमीने नवीन स्मार्टवॉचच्या सादरीकरणासोबत स्मार्ट लाइफ पोर्टफोलियोलाही चालना दिलेली आहे. कंपनीने सर्क्युलर डायलसोबत आपले पहिले स्मार्ट वॉच लाँच केले आहे. सध्या पाकिस्तानमध्ये हे उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध आहे.  लवकरच भारतीय बाजारातही हे उत्पादन दाखल होण्याचे संकेत आहेत. दुसऱया बाजूला नॉइसने आपल्या ट्रुली वायरलेस इअरबड्सचे भारतात सादरीकरण केले आहे.

Advertisements

1. रियलमी स्मार्टवॉच एस :

रियलमी स्मार्टवॉच एसच्या रुपाने कंपनीने स्मार्टवॉच सादर केले आहे. नव्या रियलमी स्मार्टवॉचवर रक्त, ऑक्सिजन मॉनिटरसोबत अन्य चाचण्या करणे ग्राहकांना सोपे होणार आहे. यामध्ये 15 दिवस चालणाऱया बॅटरीची क्षमताही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रियलमीने वॉच प्रथम सादर केल्यानंतर पाच महिन्यांच्या कालावधीनंतर बाजारात उतरविले आहे. पाकमध्ये सध्या हे वॉच 7000 रुपये किंमतीला असून सदरच्या उत्पादनास सवलत देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

2. नॉइस एअर बड्स :

नॉइस एअर बड्सला कंपनीने ट्रुली वायरलेस स्टीरिओ(टीडब्लूएस) च्या पातळीवर लाँच केले आहे. एअरपॉड्ससारख्या स्टेम डिझाइनसह अन्य अत्याधुनिक फिचरसोबत सादरीकरण करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. टच कंट्रोल्स, वॉयस असिस्टंट, वॉटर रेजिस्टंट वैशिष्टय़ासह लाइटवेट डिझाइनमध्ये तयार केले आहे.

Related Stories

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर बाजारात घसरण

Patil_p

ओएलक्सकडून 250 जणांची कपात

Patil_p

सेल्सफोर्स देणार 5 लाख जणांना रोजगार

Omkar B

बाजारात सेन्सेक्स 374 अंकांनी मजबूत

Amit Kulkarni

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन वाढण्याची आशा

Patil_p

वाहन कंपन्या किमती वाढविण्याच्या तयारीत

Patil_p
error: Content is protected !!