तरुण भारत

दिल्लीत 6,842 नवे कोरोना रुग्ण; 51 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत मागील 24 तासात दिल्लीत 6 हजार 842 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 लाख 09 हजार 938 वर पोहचली आहे. यामधील 37,369 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Advertisements


दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 5,797 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 3 लाख 65 हजार 866 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6,703 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 48 लाख 80 हजार 433 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 14,571 आरटीपीसीआर टेस्ट आणि 44,336 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 


सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 11.61 % आहे. तर 3,596 झोन आणि 364 कंट्रोल रूम आहेत. 

Related Stories

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या 10-12 वीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलैपर्यंत

Rohan_P

आसाम-नागालँड सीमेजवळील चकमकीत डीएनएलएचे ६ दहशतवादी ठार

Abhijeet Shinde

रेल्वेचे जनरल डबेही होणार वातानुकुलित

Patil_p

CBSC BORD : बारावीच्या निकालाबाबत शाळांना दिला नवा आदेश

Rohan_P

हे अमेरिकेचे न्यायालय नव्हे!

Patil_p

‘ब्रह्मोस’चे युद्धनौकेवरून यशस्वी प्रक्षेपण

Patil_p
error: Content is protected !!